Sub-Divisional Agriculture Officer Ashok Damle and officials during the inspection and Panchnama of the damaged farmer Rajendra Ahire maize field. esakal
नाशिक

Nashik Agriculture News : मक्याची अवघी 50 टक्केच उगवण! निवाणेतील शेतकऱ्याची व्यथा

Nashik News : निवाणे (ता. कळवण) येथील शेतकरी राजेंद्र आहेर यांनी त्यांच्या शेतात सेमिना कंपनीच्या ‘ब्रह्मा ११०१’ या मक्याच्या वाणाची पेरणी केली.

सकाळ वृत्तसेवा

कळवण : निवाणे (ता. कळवण) येथील शेतकरी राजेंद्र आहेर यांनी त्यांच्या शेतात सेमिना कंपनीच्या ‘ब्रह्मा ११०१’ या मक्याच्या वाणाची पेरणी केली. परंतु वीस दिवसांनंतरही केवळ पन्नास टक्केच मका उगवल्याने मोठे नुकसान झाले आहे. श्री. आहेर यांनी कृषी विभागाच्या तक्रार निवारण समिती यांच्याकडे संबंधित कंपनीविरुद्ध तक्रार केली आहे. (Agriculture Only 50 percent germination of corn in Nivan)

तक्रारीत म्हटले आहे, की केवळ पन्नास टक्केच मका उगवल्याने पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाणार असून, उत्पन्नाची हमी राहिलेली नाही. बियाण्यांसह खते, मजुरी असा एकूण खर्च ४६ हजार २४० रुपये आहे. या शेतीतून दर वर्षी किमान चार लाखांचे उत्पन्न होते. या वर्षी मात्र खर्चही निघेल की नाही, याची शाश्वती नाही. उलट पन्नास हजार रुपये आता कर्ज पेरणीच्या नावाने झाले आहे.

संबंधित कंपनीकडून विशेष समिती नेमण्यात आली असून, त्या समितीने पेरणी केलेल्या क्षेत्रावर निरीक्षण केले असता शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल न घेता याउलट शेतकऱ्याला दमदाटी करून शेती क्षेत्रात पुरेशी ओल नसताना पेरणी केल्यामुळे मका बियाण्याची उगवण क्षमता पूर्णतः कमी झाली आहे. याबाबत कंपनी कुठलीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. (latest marathi news)

कंपनीकडून अन्याय झाल्याने श्री. आहेर यांनी कळवण कृषी विभागाकडे दाद मागितली असता उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे, कळवण तालुका कृषी अधिकारी मीनल म्हस्के, विषय विश्लेषक कृषी केंद्र वडेल, सदस्य तथा प्रतिनिधी महाबीज, सदस्य तथा सचिव कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी व पंचनामा करून राजेंद्र आहेर यांच्या नुकसानीबद्दलचा स्वयंस्पष्ट अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे.

"कंपनीचे पन्नास टक्केच बियाणे उगविले, याचा अर्थ शेतात पुरेशी ओल होती. त्यामुळे कंपनीचे म्हणणे चुकीचे असून, कंपनीने भरपाई द्यावी. कृषी विभागाने याची दखल घ्यावी व कंपनीवर कडक फौजदारी कारवाई व्हावी." - राजेंद्र आहेर, शेतकरी, निवाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dussehra Rally Speech: ‘’मी वर्क फ्रॉम होम अन् फेसबुक लाईव्ह करणारा नाही’’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Shivsena Dasara Melava: ''...ही गोष्ट मान्य केली पाहिजे'', लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे भाजपवर बोलले

Dussehra Melava 2025 Live Update: हिंदुत्व म्हणजे टी-शर्ट आहे का?- एकनाथ शिंदे

Uddhav Thackeray Dussehra Rally : उद्धव ठाकरेंचा भर पावसात दसरा मेळावा; संघ, मोदी अन् 'कमळाबाई' थेट निशाण्यावर, म्हणाले...

Durga Visarjan Tragedy : दसऱ्याच्या उत्सवाला गालबोट, दुर्गादेवीचे विसर्जन करताना ६ तरुण बुडाले, दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT