Devnadi in Sinnar taluka is still dry. esakal
नाशिक

Nashik Agriculture News : सिन्नरला दुबार पेरणीचे संकट! नद्या, बंधारे, ओढे-नाले कोरडेच

Nashik News : तालुक्यात दमदार पाऊस न झाल्यास आगामी काळात पुन्हा पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. शेतीबरोबरच जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचीही कमतरता भासण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यात पावसाने अनेक ठिकाणी ओढ दिल्याने पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील अनेक नद्या आणि बंधारे, ओढे, नाले कोरडेच आहे. धरणसाठ्यातून मिळणारे पाणी कमी झाले आहे. (Sinnar double sowing crisis)

त्यातच दोन-चार दिवसात दमदार पाऊस न झाल्यास पिके करपून जातील. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष दमदार पावसाकडे लागून राहिले आहे. तालुक्यात दमदार पाऊस न झाल्यास आगामी काळात पुन्हा पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. शेतीबरोबरच जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचीही कमतरता भासण्याची शक्यता आहे. शहरासह तालुक्यातील अनेक गावांना अजूनही या धरणात काहीच पाणी

आले नसल्याने अनेकांना टँकरचे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. अनेक भागांत पावसाबरोबरच मिळणाऱ्या पाण्यामुळे शेती व जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याची सोय होत असते. पावसाने ओढ दिल्याने व कधी ढगाळ, तर कधी कडक उन असे नैसर्गिक वातावरण झाल्याने पावसामुळे वाढलेली पाणीपातळी कमी होत गेली.

तालुक्यात काही भागांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्या भागात असलेले बंधारे, मोठे बंधारे, ओढे, नाल्यांमध्ये पाणीसाठा न झाल्याने ओढे व नाल्यांना अद्याप पाणी आलेच नाही. त्यामुळे अनेक भागांतील ओढे, नाले, बंधारे कोरडेच असल्याने त्या भागात अद्याप पाण्याची कमतरता जाणवत आहे. (latest marathi news)

धरण क्षेत्रातही अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणातील पाण्यावर अवंलबून असलेल्या अनेक गावच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीदेखील कोरड्या असल्याने अनेक गावे सध्या ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईने बेजार आहेत. पावसाने चांगली सुरूवात केली परंतु, आता पुन्हा पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठ्यात घट झाली आहे. विहिरींच्या तळाला पाणी गेल्याने पिकांचे नुकसान होत आहे.

पिक वाया जाण्याची भीती

पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झाला नसून येथील नदी-नाले कोरडेठाक आहे. मका, बाजरी पिक दोन-चार दिवसात पाऊस न झाल्यास करपून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हातात आलेले पिक डोळ्यादेखत जात असताना यासारखी मोठी शोकांतीका नाही. पाऊस न पडल्यास घेतलेले बियाण्यांचे पैसे कसे परत करायचे. मुलांच्या शिक्षणाला पैसे कुठून आणायचे, याचीच चिंता शेतकऱ्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : भीषण अपघात! भरधाव येणाऱ्या मॅजिक व्हॅनची ट्रकला धडक, नऊ जणांचा जागीच मृत्यू

सायली-प्रिया दोघीही आई होणार! ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

Ghodegaon Accident: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर भीषण अपघात; समोरासमोर धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, घोडेगाव परिसरात हळहळ..

Riyan Parag:'... तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहचणार नाही', दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला रियान पराग?

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT