नाशिक

हवेचा दर्जा खालावला

CD
मेन ------------------- प्रदूषणाचा वाढता ग्राफ; हवा पोहोचली खराब श्रेणीत पांडवनगरीत सर्वाधिक वाईट स्थिती; सकाळी अधिक तीव्रता सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : दिवाळीनंतर शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. नऊ नोव्हेंबरला शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक २३४ पी.एम. नोंदविला गेला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मापदंडानुसार हा निर्देशांक खराब श्रेणीत मोडतो. ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत शहरातील हवा सातत्याने खराब ते मध्यम श्रेणीत राहिली. फटाक्यांचा धूर, वाहनांचा धूर, बांधकामांमुळे उडणारी धूळ, थंडीच्या काळात हवेत साचणारे प्रदूषक कणामुळे निर्देशांक वाढला आहे. ९ नोव्हेंबरच्या दिवसभरातील सरासरीनुसार पांडवनगरीत २८८, हिरावाडी येथे २२८, गंगापूर रस्त्यावर २१५ आणि अंबड औद्योगिक वसाहतीत २०४ असा निर्देशांक नोंदविला गेला असून, चारही केंद्रे खराब श्रेणीत होती. सकाळच्या वेळी प्रदूषण अधिक तीव्र असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ९ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी पांडवनगरीत २८५, हिरावाडी येथे २१० असा निर्देशांक नोंदविला गेला, तर गंगापूर रस्त्यावर १८९ आणि अंबड औद्योगिक वसाहतीत १८० असा निर्देशांक मध्यम श्रेणीत होता. पांडवनगरीत प्रमुख प्रदूषक सूक्ष्म कण होते. याआधी ८ नोव्हेंबरला संध्याकाळीही प्रदूषणाची पातळी उंचावलेली होती. त्या दिवशी पांडवनगरीत रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी २२३ आणि रात्री १० वाजून ५ मिनिटांनी २४१ असा निर्देशांक होता. त्याचवेळी हिरावाडी येथे १४७, अंबड औद्योगिक वसाहतीत रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी १५६ आणि रात्री १० वाजून ५ मिनिटांनी १६०, तर गंगापूर रस्त्यावर रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी १८५ आणि रात्री १० वाजून ५ मिनिटांनी १८२ असा निर्देशांक नोंदविला गेला. -----------चौकट गुणवत्ता सुधारण्याची संधी केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या वर्गीकरणानुसार शून्य ते ५० हवेत तरंगणारे सूक्ष्म धूलिकण चांगली (पर्टीक्युलेट मॅटर), ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम, २०१ ते ३०० खराब, ३०१ ते ४०० अतिशय खराब आणि ४०१ ते ५०० गंभीर अशी श्रेणी मानली जाते. खराब हवेत दीर्घकाळ श्वास घेतल्यास श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे आणि दम लागणे यासारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे दमा व हृदयविकार असलेल्या रुग्णांनी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी आणि संध्याकाळी फिरणे टाळावे, तोंडावर आवरण वापरावे आणि गरज नसताना घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. -------------------- ९ नोव्हेंबरची केंद्रनिहाय दिवसभरातील सरासरी स्थिती (श्रेणी पी.एम. मध्ये) - पांडवनगरी- २८८ - हिरावाडी- २२८ - गंगापूर रस्ता- २१५ - अंबड औद्योगिक वसाहत- २०४ ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: "उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनील तटकरेंनीच दादांचा घात केला"; रामदास कदमांच्या विधानामुळे महायुतीत खळबळ

SCROLL FOR NEXT