nashik ozar airport 1.jpg Google
नाशिक

नाशिक विमानतळ येणार हज टर्मिनलच्या यादीत

विनोद बेदरकर

नाशिक : हज यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्राचे मुख्य केंद्र म्हणून नाशिकला मिनी हाऊस व्हावे तसेच मुंबईऐवजी नाशिक येथून हज येथे जाणाऱ्या भाविकांना विमानसेवा उपलब्ध व्हावी, नाशिक विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेश व्हावा यासाठी सुरु असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. याबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी नवाब मलिक यांनी केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहारमंत्री मुक्तार नक्वी यांच्याकडे शिफारस केली आहे.

भाविकांची गैरसोय टळणार

खासदार गोडसे यांनी आज दिल्लीत नक्वी यांची भेट घेत उत्तर महाराष्ट्रातील हज यात्रेकरुंसाठी नाशिक विमानतळाचा समावेश करण्याची मागणी केली. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार या जिल्ह्यातून दरवर्षी १२ ते १५ हजार मुस्लिम हज यात्रेला जातात. गेल्यावर्षी राज्यातून हज यात्रेसाठी सुमारे पंधरा हजार भाविक गेले होते. यापैकी तीन हजार भाविक एकट्या उत्तर महाराष्ट्रातून गेले. शासनाने त्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरु केली असली तरी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भाविकांना मुंबईला तीन ते चार चकरा माराव्या लागतात. कागदोपत्रांच्या पूर्तेतेनंतरच भाविकांना मुंबई विमानतळावरुन हजयात्रेला जावे लागते. यात पैसे आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिकला मिनी हज हाऊस व्हावे आणि विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेश व्हावा, यासाठी खासदार गोडसे यांचा राज्य आणि केंद्राकडे पाठपुरावा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Eknath Shinde Meeting : अमित शहा-एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा; एकाच कारमधून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

SCROLL FOR NEXT