Malegaon Ajay Wakode breaking the kairi on the camp road here. esakal
नाशिक

Nashik News : लोणच्याची कैरी फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह; तरुणांच्या मेहनतीचे कौतुक

Nashik News : लोणच्याची कैरी फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह येथील अजय वाकोडे व त्यांचे कुटुंबीय करीत आहे. लोणचे ग्रामीण, शहरी भागातील जेवणातील अविभाज्य घटक आहे.

सकाळ वृत्तसेवा

विनोद चंदन : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : पावसाचे आगमन होताच शहर व ग्रामीण भागामध्ये लोणच्याची कैरी उतरून लोणचे बनविण्याच्या कामात महिला-भगिनी व्यस्त आहेत. लोणच्याची कैरी फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह येथील अजय वाकोडे व त्यांचे कुटुंबीय करीत आहे. लोणचे ग्रामीण, शहरी भागातील जेवणातील अविभाज्य घटक आहे. (Ajay Wakode and his family earn their livelihood by breaking pickle Kairi)

शेतकरी शेतात लोणचे-भाकर न्याहारीला आवडीने खात असतो. लोणचे बनविण्याचे काम महिलांसाठी मोठे कसरतीचे ठरते. त्यात कडक कैरी फोडण्याचे काम जिकरीचे मानले जाते. जुन्या काळी कैरी हाताने फोडायची, त्यानंतर आडकित्ता सारखे साधन आले. सध्याच्या आधुनिक काळात लोणच्याची कैरी कोण फोडेल, असा प्रश्‍न पडतो.

कैरी फोडायला आताची तरुण पिढी धजावत नाही. हे काम आवघड वाटते. हाताला फोड येतील, हात कापला जाईल, आडकित्ता चालत नाही, कष्ट करण्याची वृत्ती दिसत नाही. अशी अनेक कारणे देत कैरी फोडत नाही. गावरान कैरी, कलमी कैरी असे प्रकार आहेत. म्हणून शहरी भागातील काही युवक, नागरिक उदरनिर्वाहासाठी येथील एकात्मता चौकातील रस्त्यावर कैरी फोडण्याचे काम गेल्या दीड महिन्यांपासून करीत आहेत.

यातून त्यांना दोन पैसे मिळत कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. ते दररोज २०० ते ३०० किलो कैरी फोडतात. कैरी फोडण्याचे काम हे २० ते ४० रुपये किलोने केले जाते. त्यांच्याकडे विक्रीसाठी आडकित्ता देखील उपलब्ध आहे. कैरी फोडण्यासाठी असलेल्या आडकित्त्याची किंमत ४५० रुपयांपासून ते ३ हजारपर्यंत विक्रीला आहेत. (latest marathi news)

धारेधार, पाजलेला आडकित्तेने दिवसभर त्यांच्याकडे ग्रामीण, शहरी भागातून लांबून नागरिक येतात. त्यात ताहाराबाद, नामपूर, सटाणा, निमगाव, सोयगाव, मालेगाव परिसरातील नागरिक कैरी फोडण्यासाठी आलेल्यांची माहिती अजय वाकोडे यांनी दिली.

दिवसभर कैरी फोडत हाताला चटके सहन करावे लागतात. आम्हा गरीब लोकांना कष्टातून, महेनतीने पैसा मिळवत कुटुंबाचा गाडा हाकलावां लागतो. कुटुंबातील आम्ही सगळेजण आडकित्याच्या साहाय्याने कैरी फोडण्याचे काम करत आहोत.

"लोणच्याची कैरी फोडण्याचे काम दीड महिन्यापासून सुरू केले आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. नागरिक एक, दोन किलो कैरी फोडण्यासाठी भाव करतात. आमच्या कष्टचे मोल केले पाहिजे." - अजय वाकोडे, कैरी फोडणारा युवक, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT