Nashik Assembly Constituency  esakal
नाशिक

Nashik Assembly Constituency : मध्य विधानसभा मतदारसंघात धोक्याची घंटा! महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी

Nashik News : लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदारसंघातील मतदानाचे आकडे बाहेर पडल्यानंतर त्यातून नाशिक शहरातील मध्य विधानसभा मतदार संघात धोक्याची घंटा वाजली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदारसंघातील मतदानाचे आकडे बाहेर पडल्यानंतर त्यातून नाशिक शहरातील मध्य विधानसभा मतदार संघात धोक्याची घंटा वाजली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये नाशिक पश्चिम, पूर्व, देवळाली, सिन्नर व इगतपुरी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. लोकसभेच्या एकूण मतदारसंघापैकी चार मतदार संघ हे शहरी भागात असल्याने या शहरी भागातील मतदार ठरवितात तोच खासदार निवडून येतो. (Nashik Assembly Constituency)

शहरी भागामध्ये जवळपास १२ लाख मतदार आहे. त्यामुळे यंत्राचा शहरी भागातील नागरिकांचा कल काय आहे, यावर महायुतीच्या उमेदवाराचे गणित अवलंबून होते. पूर्व, मध्य व पश्चिम या मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत, तर देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आहे.

इगतपुरीमध्ये काँग्रेसचे आमदार आहे, तर सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ॲड. माणिक कोकाटे हे आमदार आहेत. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे पारडे जड दिसत होते. मात्र मतपेटीतून मतदारांनी धोक्याची घंटा दिली आहे.

पूर्व व पश्चिम मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत लीड कमी असला तरी महायुतीच्या उमेदवाराने येथे आघाडी घेतली आहे. मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र महायुतीच्या लीडची वजाबाकी झाल्याने विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीसाठी धोक्याची घंटा वाजल्याचे बोलले जात आहे. (latest marathi news)

२०१९ मध्ये १ लाख तीन हजारांचा लीड

पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये जवळपास १ लाख तीन हजारांचा लीड होता. तो लीड यंदा मिळाला असला तरी जवळपास ८० हजार मतांची घट झाली आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात दहा हजार तीनशे मतांचा लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळाला आहे. येथे लीड कमी असला तरी येथे महायुतीला संधी दिसून येते.

सिन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांना विक्रमी लीड मिळाल्याने विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीसाठी सोपी तर महायुतीसाठी अडथळे निर्माण करणारे ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT