Demonstrations going on during the mock drill at Govind Nagar. esakal
नाशिक

Nashik News : धोक्याचा भोंगा वाजला अन...अग्निशमन दलाचे मॉक ड्रिल असल्याचे लक्षात येताच जीव पडला भांड्यात!

Nashik News : मनपाकडून गोविंदनगर परिसरातील चंद्रमौळी या बहुमजली रहिवासी इमारतीमध्ये मॉक ड्रिल असल्याचे लक्षात येताच जीव भांड्यात पडतो...

सकाळ वृत्तसेवा

सिडको : धोक्याचा भोंगा वाजतो... सर्वत्र धावपळ सुरू होते... अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका ‘सायरन’ वाजवित गोविंद नगरमध्ये पोचतात... यंत्रणेची धावपळ सुरू होते. अन मनपाकडून गोविंदनगर परिसरातील चंद्रमौळी या बहुमजली रहिवासी इमारतीमध्ये मॉक ड्रिल असल्याचे लक्षात येताच जीव भांड्यात पडतो.

मंगळवारी (ता.१६) येथे आग विझविण्याचे मॉक ड्रिल करण्यात आले. त्यामध्ये धुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका तसेच हायड्रोलिक प्लॅटफॉर्म ब्रँटोच्या (उंच शिडी) सहाय्याने आश्रयस्थान भागातून (रिफ्युज एरिया) लहान मुलांना बाहेर काढण्यात आले. (Nashik mock drill at govind nagar chandramauli building marathi news)

नाशिक महापालिका अग्निशमन विभागामार्फत १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत. चंद्रमौळी इमारतीमधील महिलांना अग्निनिर्वाणके (फायर एक्सटिंगुशर) कशाप्रकारे हाताळून आग विझवावी, याबाबत माहिती दिली.

एलपीजी गॅस सिलिंडर हाताळताना कशाप्रकारे काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. आग लागली तर कशी आटोक्यात आणावी, याबाबत नागरिकांना माहिती दिली. जवानांनी इमारतीमधील आग प्रतिबंधक उपाययोजना कशाप्रकारे ऑपरेट करायची याचीही माहिती दिली.  (latest marathi news)

या मॉक ड्रिलमध्ये चंद्रमौलीचे चेअरमन किरण सोनार, सचिव नितीन कोठावदे, डॉ. राहुल जगताप, धनंजय वाड, भूषण पाचपुते, संकल्प गोयरोला, सुधीर चंद्रात्रे, योगेश बागूल, सुधीर वरखेडे, शशी कुमार, अवंती वाड, सानिका सांगळे, सोनावणे, अक्षय जैन, पूजा हिरे, सुहासिनी पाटील, रूपाली दुशिंग, प्रतिभा सोनार, प्रसन्न रानजिता, कल्पना गिरासे, नागरे, डॉ. मयूरी पाटील, प्राप्ती महाजन यांच्यासह मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, अग्निशामक अधिकारी प्रदीपसिंग परदेशी, लीडिंग फायरमन प्रमोद लहामगे, मोहन मध्ये, मुकुंद सोनवणे, अर्शद पटेल, चव्हाणके, वाहन चालक नंदू व्यवहारे, शांताराम गायधनी, मुस्ताक पाटकरी तसेच महाराष्ट्र फायर सर्व्हिस अकादमीच्या १० जवानांनी सहभाग घेतला.

आर्यवर्त सोसायटीतील बी विंग मध्ये देखील अशाच प्रकारचे मॉकड्रीलचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नागरिकांनीही भविष्यात समय सूचकता पाळण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला! सिल्व्हर ओक निवासस्थानी सांत्वन भेट

Manipur Government Formation Update: मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग!, भाजपसह सर्व ‘NDA’ आमदारांना दिल्लीला बोलावले

Latest Marathi News Union Budget 2026: व्हेनेझुएलाकडून भारत तेलाची खरेदी करणार - डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

Nagpur Municipal Corporation: नागपूर महानगरपालिकेत भाजपने १०२ नगरसेवकांचे राजीनामे घेतले; नेमकं कारण काय?

Pune News : वैद्यकीय पर्यटनाला मिळेल चालना, आयात शुल्क कमी केल्याने औषधे स्‍वस्‍त; आरोग्य क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले समाधान

SCROLL FOR NEXT