From Dudh Bazar to Phalke Road market, Muslim brothers thronged for shopping. esakal
नाशिक

Ramadan Festival : रमजान ईदनिमित्त गजबजल्या बाजारपेठा; दूध बाजार, फाळके रोडवर प्रथम बाजार

Ramadan Festival : रमजान ईद अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. यामुळे रमजान ईदच्या खरेदीने शहरातील सर्वच बाजारपेठा गजबजून निघाल्या आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ramadan Festival : रमजान ईद अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. यामुळे रमजान ईदच्या खरेदीने शहरातील सर्वच बाजारपेठा गजबजून निघाल्या आहे. दूध बाजार ते फाळके रोडवरील खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळत आहे. यंदा प्रथमच याठिकाणी बाजार भरला आहे. असे असताना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रमजान ईद उत्साहात साजरी करण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून खरेदीस वेग आला आहे. (nashik All markets in city are crowded with Ramadan Eid shopping marathi news)

चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठापर्यंत प्रत्येक जण खरेदीत गुंतलेला आहे. विशेषत: कपडे, पादत्राणे, इस्लामी टोपी खरेदीकडे नागरिकांचा अधिक कल आहे. दिवसा उन्हाचा चटका जाणवत असल्याने सायंकाळी इफ्तारनंतर मेनरोड, शालिमार, भद्रकाली तसेच दूध बाजार बाजारपेठेत मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी गर्दी उसळत आहे. शेवटचे दोन दिवस असल्याने गर्दीत आणखीनच भर पडली आहे. सर्वाधिक कपड्यांची खरेदी होताना दिसत आहे.

मुख्य रस्त्यावर भरला बाजार

दूध बाजार चौक ते फाळके रोड पर्यंतच्या मार्गावर दरवर्षी केवळ इफ्तार बाजार भरत असत. यंदा प्रथमच इफ्तार झाल्यानंतर अन्य बाजार थाटत आहे. कपडे, पादत्राणे, महिलांचे आभूषण, अत्तर, भेटवस्तू, खाद्यपदार्थ, सजावटीचे साहित्य, मेहंदी, मेहंदीचे कोण यासह रमजान ईदनिमित्ताने लागणारी प्रत्येक वस्तू वाजवी दरात नवीन बाजारात उपलब्ध झाली आहे. एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळत असल्याने खरेदीसाठीची पायपीट कमी झाली आहे. (latest marathi news)

नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः: रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ उघडी राहत असल्याने शहराच्या विविध भागातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहे. अशाच प्रकारची खरेदी केवळ मुंबईच्या मोहम्मद अली रोड येथील बाजारात बघावयास मिळत असते. तेच चित्र सध्या दूध बाजार ते फाळके रोड बाजारात दिसत असल्याने जणू याठिकाणी मोहम्मद अली रोड बाजारपेठ अवतरली. अशी चर्चा होत आहे.

ऑनलाइन खरेदीचा परिणाम

सध्या ऑनलाइनचे युग आहे. प्रत्येक गोष्ट ऑनलाइन होत आहे. त्यातून विविध प्रकारची खरेदी विक्रीही सुटली नाही. रमजान ईदच्या खरेदीवरही त्याचा काहीसा परिणाम झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. ऑनलाइन खरेदीमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने काही विक्रेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT