Godavari Urban Cooperative Bank  esakal
नाशिक

Nashik News : गोदावरी नागरी सहकारी बँकेला 3.16 कोटींचा नफा : अमृता पवार

Nashik : गोदावरी नागरी सहकारी बँकेला मावळत्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३.१६ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गोदावरी नागरी सहकारी बँकेला मावळत्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३.१६ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. आगामी वर्षात बँकेने शाखा विस्तारावर भर देण्याचे धोरण ठरविले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अमृता पवार यांनी दिली. आर्थिक वर्षात गोदावरी बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मालेगाव येथे उघडण्यात आलेल्या नव्या शाखेला नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभला आहे. (Nashik Amrita Pawar statement of Godavari Urban Cooperative Bank 3.16 Crore profit marathi News )

विशेषत: व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना त्यांची गरज भागवता यावी यासाठी सर्वात स्वस्त आणि सुलभ सुवर्ण कर्ज योजना बँकेतर्फे राबविण्यात येत आहे. योजनेचा अनेक सभासद आणि ग्राहकांनी लाभ घेतला आहे. बँकेने प्रशासकीय कामकाजावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मावळत्या वर्षात बँकेचा एनपीए शून्य टक्के वर आणण्यात यश आले आहे. आगामी वर्षात नवीन शाखा उघडण्यात येतील त्याद्वारे बँकेच्या आर्थिक आणि व्यावसायिक कक्षेचा विस्तार करण्यात येईल. (latest marathi news)

त्यासाठी सर्व सभासद ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसूत्रता निर्माण करण्यात येईल. त्यांच्या सहकार्याने बँक विस्तारीकरणाचा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वासही अध्यक्ष पवार यांनी व्यक्त केला. मावळत्या आर्थिक वर्षात बँकेचे भाग भांडवल ५.४८ कोटी, ठेवी १३७.८३ कोटी, कर्ज वितरण ७५.७९ कोटी, स्वनिधी ३५.३४ बँकेची गुंतवणूक ९४.८९ कोटी आणि खेळते भांडवल १८८.५४ कोटी अशी आर्थिक स्थिती आहे.

बँकेचे उपाध्यक्ष वसंत खैरनार, संचालक प्रणव पवार, सुरेश पाटील, डॉ तानाजी कानडे, दत्तात्रय पिंगळे, रवींद्र मणियार, मनोहर देवरे, अमोल महाले, अनिल भालेराव, रावसाहेब कोशिरे, कार्यकारी संचालक सुरेश गव्हाणे आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाचं काय होणार? CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं

Pune Rain Update: पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट; खडकवासला धरण १०० टक्के भरले, चारही धरणांत किती टक्के पाणीसाठा?

Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह ६० देशांना झटका, नवीन टॅरिफ जाहीर; व्यापारावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT