Crime Latest Marathi News esakal
नाशिक

नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाला लुटले

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाच दिवशी व भरदिवसा सोन्याचे दागिने लांबविण्याच्या दोन घटना घडल्या.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाच दिवशी व भरदिवसा सोन्याचे दागिने लांबविण्याच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत वृद्धाला पोलिस असल्याची बतावणी दोघा भामट्यांनी केली, तर दुसऱ्या घटनेत रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याला कडेला थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी खेचून नेली. या दोन्ही घटना भरदिवसा घडल्याने पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे. (Latest Marathi News)


पंढरीनाथ महादू जाधव (७२, रा. हनुमंत नगर, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. १७) दुपारी ते घराबाहेर पडले. दुचाकीवरून पोलिस वर्दी घातलेले दोघे आले आणि त्यांनी जाधव यांना रोखले. ‘बाबा, सोन्याचे दागिने घालून कुठे फिरतात. कोणीही लूटमार करील. काढा ते आणि रुमालात बांधून खिशात ठेवा’ असे म्हणून एकाने जाधव यांना त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चैन व १५ हजारांची सोन्याची अंगठी काढून रुमालात ठेवायला लावली. संशयिताने हातचलाखी करून गाठ मारून रुमाल त्यांच्या हातात दिला. घरी आल्यानंतर जाधव यांनी रुमालाची गाठ सोडून पाहिले असता, दागिने नव्हते. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल असून, उपनिरीक्षक बटुळे हे तपास करीत आहेत.


भरदिवसा सोन्याची पोत खेचली

नाशिक- पुणे महामार्गावरील रस्ता ओलांडताना महिलेच्या गळ्यातील सव्वालाखांची सोन्याची पोत दुचाकीवरून भामट्यांनी खेचून नेल्याचा प्रकार भरदिवसा घडला. भारती नीरज कासलीवाल (रा. पखाल रोड, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, श्रीमती भारती या बुधवारी (ता. १७) मुलीसमवेत वेस्ट साइड मॉल येथे आल्या होत्या. दुपारी त्या महामार्गावरील रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबल्या होत्या. त्या वेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून काळ्या रंगाचे हेल्मेट घातलेले दोघेजण आले आणि त्यांच्यातील एकाने श्रीमती भारती यांच्या गळ्यातील ४२ ग्रॅम वजनाचे १ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून नाशिक रोडच्या दिशेने भरधाव वेगात पळून गेले. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक व्ही. एस. लोंढे हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT