Abhinav Bharat building sakal
नाशिक

Andaman Jail : अभिनव भारत मंदिरात साकारणार ‘अंदमान कारागृह’

प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काही काळ वास्तव्य असलेल्या जुन्या नाशिकमधील अभिनव भारत मंदिराचा अर्थात जीर्ण झालेल्या वाड्याचा पुनर्विकास केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काही काळ वास्तव्य असलेल्या जुन्या नाशिकमधील अभिनव भारत मंदिराचा अर्थात जीर्ण झालेल्या वाड्याचा पुनर्विकास केला जात आहे. यात सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या अंदमान कारागृहाची हुबेहुब प्रतिकृती साकारून त्यात अंदमान कोठडी उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे.

जुन्या नाशिकमधील दातार वाड्याच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पाच कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. ‘अभिनव भारत मंदिर’ असे नाव दिलेल्या या वाड्यात अंदमान कारागृहासारखी प्रतिकृती तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे.

कारागृहाच्या भिंतीप्रमाणे या वाड्याच्या दगडी भिंती असतील. पण आतून त्या फार मजबूत राहणार असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने त्याला कुठलाही धोका निर्माण होणार नाही. सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग येथे नागरिकांना बघायला मिळतील. शंभर वर्षांपूर्वी वाडा ज्या पद्धतीने दिसत होता, त्यास्वरुपाची प्रतिकृती तयार करण्यात येत आहे.

तसेच सावरकरांचे अजरामर ठरलेले साहित्य या ठिकाणी वाचायला मिळेल. यातून देशभक्तीची प्रेरणा आजच्या युवकांना मिळेल. विशेष म्हणजे ज्या तुळशी वृंदावनाची सावरकर कुटुंबांनी मनोभावे पूजा केली तिचे जतन करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या वाड्यात सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांचेही वास्तव्य होते. त्यांच्याही काही आठवणी येथे पाहायला मिळतील.

विशेषत: त्यांचे दुर्मिळ फोटो मिळवण्याचे कार्य सध्या सुरु आहे. स्वा.सावरकर स्मारकास भेट देण्याऱ्या व्यक्तींना प्रखर देशभक्तीची प्रेरणा मिळेल, यादृष्टीने स्मारकाची रचना तयार करण्यात येत आहे. स्मारकाची प्रतिकृती अंतिम झाल्यानंतर त्याला तांत्रिक मान्यता घेतली जाईल आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून संबंधित ठेकेदारास कार्यारंभ आदेश दिले जातील. अनेक वर्षांपासून रखडलेले काम अखेर मार्गी लागल्याने सावरकरप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

अभिनव भारत मंदिराची वैशिष्ट्ये

  • स्वा. सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची प्रतिकृती

  • शंभर वर्षांपूर्वीप्रमाणे वाड्याची प्रतिकृती साकारणार

  • स्वा. सावरकरांनी शिक्षा भोगलेली कोठडी

  • साहित्य, दुर्मीळ फोटो बघायला मिळतील

  • सावरकर कुटुंबाने पुजलेल्या तुळशी वृंदावनाचे होणार जतन

अभिनव भारत मंदिरात अंदमान कारागृहातील कोठडी साकारणार आहोत. तसेच शंभर वर्षांपूर्वी वाडा ज्या स्वरूपात दिसत असेल, त्याच स्वरूपाची रचना आम्ही तयार करत आहोत. इमारतीची संपूर्ण रचना झाल्यानंतर त्याला मान्यता घेण्यात येईल.

- अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT