Women protesting for water at the municipal headquarters on Monday. The table shown in the second photograph. esakal
नाशिक

Nashik News : संतप्त महिलांचा महापालिका मुख्यालयाला घेराव! पाण्यासाठी तीन तास ठिय्या; आश्‍वासनानंतर आंदोलन मागे

Latest Nashik News : तीन तास हंडा घेऊन मुख्य दरवाजाच्या पायऱ्यावर बसून ठिय्या दिला. प्रशासनाकडून ठोस आश्‍वासनासह पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांच्या बदलीच्या प्रस्तावाचे आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले गेले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अपुरा व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे सिडको विभागातील खुटवडनगर, डीजीपीनगर व वृंदावननगरच्या महिलांच्या संतापाचा बांध सोमवारी (ता. १४) फुटला. तब्बल दहा बस भरून आलेल्या महिलांनी बससह महापालिकामुख्यालयाला घेराव घातला. तीन तास हंडा घेऊन मुख्य दरवाजाच्या पायऱ्यावर बसून ठिय्या दिला. प्रशासनाकडून ठोस आश्‍वासनासह पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांच्या बदलीच्या प्रस्तावाचे आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले गेले. (Angry women surrounded NMC headquarters

शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर, दारणा व मुकणे धरण शंभर टक्के भरलेले असताना शहरात अनेक भागात महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याची वेळ निश्‍चित नाही, पाणी आलेच तर त्याचा दाब अत्यंत कमी असतो. जेथे मुबलक पुरवठा आहे, तेथे गढूळ पाण्याचा पुरवठा अशा एक ना अनेक समस्या आहेत.

त्यात आता सणासुदीचे दिवस आहे. दिवाळीनिमित्त घरांची स्वच्छता सुरू झाली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. अशा परिस्थितीत संतप्त महिलांनी प्रभाग क्रमांक २८ चे माजी नगरसेवक दीपक दातीर, सुवर्णा मटाले, डी. जी. सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली थेट महापालिका मुख्यालय गाठले.

महिलांच्या तीव्र भावनांचे दर्शन व्हावे यासाठी सहा बसमधून महिला महापालिकेत दाखल झाल्या. पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, आर या पार या....आयुक्त साहेब बाहेर या. अशा घोषणा देत महिलांनी संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्या कमल पाटील यांनी दररोज फक्त तीन हंडे पाणी येत असल्याची तक्रार केली.

सुनीता हसे यांनी सणासुदीच्या तोंडावर पाणी नसल्याने कामे करता येत नसल्याची खंत व्यक्त केली. विमल ताकाटे यांनी अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पाहुण्यांना बोलविता येत नसल्याचे सांगितले. पायऱ्यांवरच हंडे ठेवत आयुक्त स्वतः येत नाही, तोपर्यंत हटणार नसल्याची भूमिका घेण्यात आली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांच्या बदलीची मागणी या वेळी करण्यात आली. महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्यातर्फे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी निवेदन स्वीकारले. (latest marathi news)

"सुरळीत पाण्याचे तसेच कार्यकारी अभियंत्यांच्या बदलीचा प्रस्ताव तयार करण्याचे आश्‍वासन मिळाले. लवकर निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करू."

- दीपक दातीर, माजी नगरसेवक

"धरणात पुरेसे पाणी असूनही सिडकोवासीयांना पाणी नाही. तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. आयुक्त भेटत नाही."- सुवर्णा मटाले, माजी नगरसेविका

"आज शांततेत आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू."

- डी. जी. सूर्यवंशी, माजी नगरसेवक

आंदोलनात महत्त्वाचे

- पाणीप्रश्‍नावर महापालिकेवर तब्बल पाचवे आंदोलन

- सकाळी ११ ते दुपारी दोनपर्यंत महिलांचा ठिय्या

- पाणीप्रश्‍नावरून दोन्ही शिवसेना एकत्र

- ५० सीटरच्या सहा बस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत

- आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याविरोधात घोषणाबाजी

- आंदोलनानंतर पाण्याचा बाटल्यांचा प्रवेशद्वारासमोर खच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT