नाशिक

शहरात पोलिसांचे ‘अँटी टेरर ड्राईव्ह’

CD
नाशिकमध्ये पोलिसांचे ‘अँटी टेरर ड्राईव्ह’ -------------- राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लॉज, भाडेकरू, कॅफे, धार्मिकस्थळी तपासणीसत्र ------------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगामी नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावले उचलण्यात आली आहेत. पोलिस आयुक्तालयातर्फे विशेष ‘अँटी टेरर ड्राईव्ह’ राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील १४ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत भाडेकरू तपासणी, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, सायबर कॅफे आणि संवेदनशील ठिकाणी धडक तपासणी मोहीम राबवून संशयितांवर बारीक नजर ठेवली जात आहे. ------------ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ आॅक्टोबरला राष्ट्रपती मुर्मू या हस्ते होणार आहे. केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिगण उपस्थित राहतील. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हेशाखेकडून शहरात दहशतवाद विरोधी मोहीम (अँटी टेरर ड्राईव्ह) हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पोलिस ठाणेनिहाय छापासत्र राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेदरम्यान शहरातील भाडेकरूंची कसून तपासणी केली जात आहे. हॉटेल्स, लॉज व धर्मशाळांची झाडाझडती घेऊन तेथील मुक्कामी असलेल्या नागरिकांच्या नोंदी तपासण्यात येत आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांना पोलिसांनी भेटी देऊन नियमित सुरक्षेचा आढावाही घेतला जात आहे. शहरातील १४ पोलिस ठाण्यांसह शहर गुन्हशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखांची पथके, अंमलीपदार्थ विरोधी पथक, गुंडाविराेधी पथक आणि विशेष शाखेची गोपनीय पथकांकडून शहरावर वॉच ठेवला जात आहे. १६-१ सायबर, मोबाईल विक्रेते रडारवर शहरातील सायबर कॅफे आणि मोबाईल, सीमकार्ड विक्रेत्यांकडेही कसून चौकशी केली जात आहे. प्रॉपर्टी एजंटस्‌कडे मालमत्तेसंदर्भात होणाऱ्या चौकशीचीही माहिती घेतली जात आहे. शहरातील बेपत्ता व्यक्तींच्याही नोंदी तपासल्या जात आहेत. सुरक्षिततेच्या अनुषंगाने शहरातील मॉल्स, मल्टिप्लेक्स यासह जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्री व्यावसायिकांकडील नोंदीसह चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. अंमली पदार्थविरोधी पथकही करडी नजर ठेवून आहेत. १६-१ बांग्लादेशींवर कडक नजर गेल्या आठवड्यात शहरात आणखी दोन बांगलादेशी नागरिकांना शहर पोलिसांनी अटक केली. वर्षभरात विनापरवाना भारतात दाखल होऊन नाशिकमध्ये वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरिक शहरात मिळून आले. आगामी कुंभमेळा आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून शहरात परदेशी नागरिकांची कसून चौकशी केली जात असतानाच, विनापरवाना परदेशी नागरिकांचाही कसून शोध घेतला जात आहे. ....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

Baramati Crime: बारामतीत राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, हाताला जखम

Devendra Fadnavis: पक्षांतर्गत सत्ताबदलात अपयश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtrachi Hasyajatra : कष्टाच्या पैशातून घेतला महागडा फोन अन् सुरू झाली टीका; गौरव मोरेच्या त्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मने

Chhatrapati Sambhajinagar: बिडकीन, शिवराईतील शीतगृहांवर FDAचा छापा; ४.१९ कोटींचा अन्नसाठा जप्त, दोन्ही संस्थांचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT