Engineering Diploma Admission esakal
नाशिक

Engineering Diploma Admission : थेट द्वितीय वर्ष पदविकेसाठी अर्जाची 3 जुलैपर्यंत मुदत

Nashik News : अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्‍या पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्‍या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची प्रक्रिया बुधवार (ता. १२)पासून सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्‍या पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्‍या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची प्रक्रिया बुधवार (ता. १२)पासून सुरू झाली आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत ३ जुलैपर्यंत असेल. (Application deadline for direct second year Diploma is 3rd July)

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता तंत्रशिक्षण संचालनालयाने थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या प्रवेशप्रक्रियेच्‍या पुढील टप्प्‍यात कॅप राउंड होणार असले, तरी प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करून कागदपत्रे अपलोड करणे, तसेच नमूद कागदपत्रांची छाननी (स्‍क्रुटीनी) करून घेणे आवश्‍यक असणार आहे.

कागदपत्रे छाननीसाठी ई-स्क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी असे दोन पर्याय उपलब्‍ध असणार आहेत. सद्यस्‍थितीत अंतिम गुणवत्ता यादीच्‍या प्रसिद्धीपर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले असून, पुढील टप्प्‍यात कॅप राउंडचे वेळापत्रक जारी केले जाणार आहे.

वर्किंग प्रोफेशनल्‍सला प्रवेशाची संधी उपलब्‍ध

थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असणार आहेत. याशिवाय, कार्यरत व्‍यावसायिक अर्थात वर्किंग प्रोफेशनल्‍स यांनाही अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी उपलब्‍ध असेल. (latest marathi news)

अशा स्वरूपाच्‍या विद्यार्थ्यांना स्‍वतंत्र तुकडीत प्रवेश दिला जाणार आहे. उपलब्‍ध जागा, पात्रतेसंदर्भातील अटी व इतर तपशील माहितीपुस्‍तिकेत उपलब्‍ध करून दिला आहे. याशिवाय, नजीकच्‍या तंत्रनिकेतनला भेट देऊन माहिती जाणून घेता येईल.

असे आहे प्रवेशाचे सध्याचे वेळापत्रक-

ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे- ३ जुलैपर्यंत

कागदपत्रांची पडताळणी (ई-स्‍क्रुटीनी/प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी)- ३ जुलैपर्यंत

तात्‍पुरत्‍या गुणवत्ता यादीची प्रसिद्धी- ५ जुलै

यादीसंदर्भात तक्रार, हरकत नोंदविण्याची मुदत- ६ ते ९ जुलै

अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी- ११ जुलै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT