YCMOU  esakal
नाशिक

YCMOU News : पुनर्परीक्षार्थींना अर्जाची ‘मुक्‍त’कडून 22 पर्यंत मुदत

YCMOU : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे विविध शिक्षणक्रमांची उन्‍हाळी सत्र परीक्षा मे महिन्‍याच्‍या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

YCMOU News : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे विविध शिक्षणक्रमांची उन्‍हाळी सत्र परीक्षा मे महिन्‍याच्‍या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरावा लागणार आहे. त्‍यासाठी विद्यापीठाने नियमित शुल्‍कासह २२ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. उन्‍हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक एप्रिल महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात प्रसिद्ध केले जाणार आहे. (nashik Application deadline for re examiners from YCMOU marathi news)

वेगवेगळ्या ८२ अभ्यासक्रमांतील विषयांच्‍या परीक्षा घेतल्‍या जाणार आहेत. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार विनाविलंब शुल्‍क परीक्षा अर्ज भरण्यासाठी २२ मार्चपर्यंत मुदत असेल. शंभर रुपये विलंब शुल्‍कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २३ ते २८ मार्च राहील. तर पाचशे रुपये विशेष विलंब शुल्‍कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २९ मार्च ते २ एप्रिल अशी असणार आहे. (latest marathi news)

प्रमाणपत्र, पदविका, पदवी, कृषी शिक्षणक्रम पदविका या अभ्यासक्रमांच्‍या लेखी परीक्षेसाठी १८० रुपये प्रति पेपर इतके शुल्‍क असेल. तर पदव्‍युत्तर पदवी आणि सर्व शिक्षणक्रम पदवी व्‍यावसायिक, तांत्रिक, विज्ञान शाखेच्‍या अभ्यासक्रमांच्‍या लेखी परीक्षेसाठी दोनशे रुपये प्रति पेपर असे शुल्‍क असेल.

तर प्रात्यक्षिक किंवा मौखिक परीक्षेसाठी २२० रुपये शुल्‍क असणार आहे. गुणपत्रिका शुल्‍क आणि विलंब शुल्‍क प्रत्‍येकी शंभर रुपये असून, अतिविलंब शुल्‍क पाचशे रुपये आहे. परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया व घ्यावयाची काळजी यासंदर्भातील सखोल सूचनापत्र विद्यापीठाने जारी केलेले आहे. त्‍यानुसार विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत परीक्षा अर्ज सादर करताना, त्‍यापोटीचे शुल्‍क अदा करत परीक्षेला प्रविष्ट व्‍हावे, असे आवाहन मुक्‍त विद्यापीठातर्फे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Corporation : मालेगाव मनपा निवडणुकीत ट्विस्ट! शेवटच्या दिवशी शिवसेनेची एन्ट्री, लता घोडके रिंगणात

Indigo Airlines Cancels Flights: ‘इंडिगो’ने घेतला मोठा निर्णय! २८ फेब्रुवारीपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं केली रद्द

Travel Tips For Parents: विमानात मुलांसोबत प्रवास करायचाय? मग ‘या’ 5 स्मार्ट टिप्स ठेवा लक्षात, ट्रॅव्हल होईल झकास!

Dhule ZP Schools : विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ थांबणार! धुळ्यातील १०८ जीर्ण वर्गखोल्यांवर फिरणार हातोडा

U19 World Cup: भारतीय फिल्डर्सना काय झालं? एकाच ओव्हरमध्ये सोडल्या तीन रनआऊटच्या संधी अन् मग अफगाणिस्तानच्या खेळाडूचं शतक

SCROLL FOR NEXT