विजय ज्योतीचे तोफखाना केंद्रात आगमन sakal
नाशिक

नाशिक : विजय ज्योतीचे तोफखाना केंद्रात आगमन

१९७१ युद्धातील ऐतिहासिक विजयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भारतीय सैन्याने १९७१ मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्याच्या जोरावर मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्त दिल्ली येथून निघालेली विजय ज्योतीचे राष्ट्रीय एकता दिनी रविवारी (ता. ३१) नाशिक रोड येथील तोफखाना केंद्रात आगमन होत आहे. ही विजय ज्योत नाशिकला ९ नोव्हेंबरपर्यंत राहणार असून, यानिमित्त नाशिक शहरात तोफखाना केंद्रातर्फे विविध कार्यक्रमाचे होणार असल्याची माहिती तोफखाना केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली.

१९७१ च्या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडले होते. या घटनेला २०२१ मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत आहे. १९७१ च्या पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजविलेल्या आणि परमवीरचक्र, महावीरचक्र विजेत्या सैनिकांच्या गावीदेखील ही विजय ज्योत घेऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या गावची माती राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे आणणार आहेत. ९ नोव्हेंबरला विजय ज्योत नाशिकहून महू (मध्य प्रदेश) येथे रवाना होणार आहे.

असे आहेत कार्यक्रम

३१ ऑक्टोबरला विजय ज्योतीचे तोफखाना केंद्राच्या अशोक चक्र गेटवर सकाळी १० .३० वाजता खास लष्करी थाटात स्वागत होईल. १ नोव्हेंबरला विजय ज्योत देवळाली एअर फोर्स स्टेशन, आणि नाशिक रोडच्या कॉम्ब्कट आर्मी एव्हिएशन स्कूलला भेट, २ नोव्हेंबरला तोफखाना केंद्र ते पांडव लेणी या दरम्यान तोफखाना केंद्रातील जवानांची सकाळी सायकल रॅली काढण्यात येईल. त्यांनतर सकाळी १०. ३० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान विजय ज्योत ओझरला एअरपोर्टला भेट देईल. सायकल रॅली गांधीनगरपासून सुरू होईल.

३ नोव्हेंबरला सकाळी ८ ते दुपारी २ वेळेत विजय ज्योतीसह सिटी मार्च होईल. ४ ला विजय ज्योत भोसला मिलिटरी स्कूलमध्ये, ५ ला सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत विजय ज्योत नाशिकमधील पोलिस प्रशिक्षण अकादमीला भेट देईल. ६ नोव्हेंबरला विजय ज्योत देवळालीच्या स्कूल ऑफ आर्टिलरीला भेट देईल. येथे १९७१ च्या युद्धातील सहभागी जवान, त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जाईल. ७ ला १९७१ च्या युद्धात सहभागी जवान, कुटुंबीयांसह त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली जाईल. ८ ला तोफखाना केंद्र नाशिक रोड येथे सकाळी ९ वाजता वॉर मेमोरिअल येथे १९७१ च्या युद्धातील सहभागी जवान, कुटुंबीयांच्या उपस्थितीत या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: नवऱ्याला नीळ्या ड्रममध्ये मारणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून प्रशासनही थबकलं; प्रियकराला दाखवायचा आहे नवजात मुलीचा चेहरा!

School Timing Change : वाढत्या थंडीमुळे शाळांच्या वेळेत बदल शाळांचा निर्णय; मुलांसह पालकांना दिलासा

Success Story: पारळ्याच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला भूवैज्ञानिक; कैलास आहेर यांचे लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र भूजल सेवा परीक्षेमध्ये यश

Vote Count Discrepancy Sangli : आष्टा नगरपालिका निवडणुकीत मतांच्या आकडेवारीत तफावत, जयंत पाटलांची एन्ट्री होताच काय घडलं; राड्याचा इशारा

Gold Silver Loot : ज्वेलरी फोडून १९ किलो चांदी ७०० ग्रॅम सोनं चोरलं, आराम बस बूक करून पुण्याला निघाला पण...; किणी टोल नाक्यावर थरार

SCROLL FOR NEXT