Plaque made by teachers at Rachna Vidyalaya to welcome students esakal
नाशिक

School First Day : शाळांमध्ये आज प्रवेशोत्‍सव; ढोलताशांच्‍या गजरात विद्यार्थ्यांच्‍या स्‍वागताची तयारी

Nashik News : नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होत असल्‍याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्‍या स्‍वागताची जय्यत तयारी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : उन्‍हाळी सुटी संपत असताना शनिवार (ता.१५) पासून शाळा पुन्‍हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होत असल्‍याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्‍या स्‍वागताची जय्यत तयारी केली आहे. ढोलताशांच्‍या गजरात व विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्‍वागताची तयारी शालेय प्रशासनाने केलेली आहे. (As new academic year begins many schools have made preparations to welcome students)

शालेय स्‍तरावर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला सुरवात होत आहे. १ मेस निकाल जाहीर झाल्‍यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रवेशाचे वेध लागलेले होते. यादरम्‍यान उन्‍हाळी सुटी असल्‍याने शालेय प्रांगणात शुकशुकाट झालेला होता. परंतु आता शैक्षणिक वर्षाला सुरवात होत असल्‍याने पुन्‍हा एकदा शालेय परिसर विद्यार्थ्यांनी गजबजणार आहे.

तत्‍पूर्वी शालेय प्रशासनाकडून शाळेचा परिसर तसेच वर्ग खोल्‍या स्‍वच्‍छ करण्याची लगबग गेल्‍या दोन-तीन दिवसांपासून सुरु होती. तसेच शनिवारी शाळा भरणार म्‍हटल्‍यावर विद्यार्थ्यांच्‍या स्‍वागतासाठी फलक लेखन व इतर सजावटीची पूर्वतयारी सुरु होती.

अनेक शाळांकडून प्रवेशोत्‍सव जल्‍लोषात साजरा करण्याचे नियोजन आखले असून, शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्‍मरणीय असाच राहणार आहे. दरम्‍यान आठवड्याचा शेवटचा दिवस असल्‍याने उपस्‍थितीवर परिणाम होण्याची शक्‍यता असून, सोमवार (ता.१७) पासून पूर्ण क्षमेतेने वर्ग भरतील, असा अंदाज व्‍यक्‍त केला जातो आहे. (latest marathi news)

असे आहे शाळांचे नियोजन

* औक्षण करत, बॅण्ड पथकाच्‍या घोषात होणार स्‍वागत

* काही शाळा गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांना देतील प्रवेश

* विविध मनोरंजनात्‍मक खेळांचे शाळांकडून आयोजन

* उन्‍हाळी सुट्यांतील किस्से गप्पा गोष्टींतून उलघडण्यावर कल

* मोफत पुस्‍तके, साहित्‍य वाटपाचे शाळांचे नियोजन

* शाळेच्‍या प्रवेशद्वारावर उभारल्‍या स्‍वागत कमानी

* काही शाळांनी प्रांगणात साकारला सेल्‍फी पॉइंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT