ZP CEO Ashima Mittal, Nashik News esakal
नाशिक

ZP CEO Ashima Mittal : ‘स्टॉप डायरिया’ मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : आशिमा मित्तल

Nashik News : जिल्ह्यात अतिसार या आजाराचे प्रमाण वाढू नये म्हणून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अतिसार थांबवा हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात अतिसार (डायरिया) या आजाराचे प्रमाण वाढू नये म्हणून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अतिसार थांबवा (स्टॉप डायरिया) हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. (Ashima Mittal statement Effectively implement Stop Diarrhea campaign)

त्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या गावात पाणी व स्वच्छतेमध्ये शाश्र्वता ठेवण्यासाठी विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मंगळवारी (ता. २) दिले. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जुलै ते ३१ ऑगस्ट २४ पर्यंत अतिसार थांबवा (स्टॉप डायरिया) अभियान राबविण्यात येणार असून.

मंगळवारी जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, तालुका आरोग्याधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी.

जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील कर्मचारी आदी उपस्थित होते. अभियानांतर्गत सर्व संबंधित विभागांनी ग्रामपातळीवर सर्व उपक्रम प्रभावीपणे राबवून पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात डायरिया आजाराचे प्रमाण वाढू नये यासाठी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश मित्तल यांनी दिले. ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणा. (latest marathi news)

सर्व विभाग या अभियानात सहभाग घेऊन शासनाने दिलेले उपक्रम राबविण्यासाठी आठवडानिहाय नियोजन करून देण्यात आले आहे. एकूण आठ आठवडे अभियान चालणार असून, प्रत्येक आठवड्यात वेगवेगळे उपक्रम गावपातळीवर घेण्यात येणार आहेत. अभियानात पाणी व स्वच्छता विभाग, महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग व शिक्षण विभाग यांचा समावेश आहे.

अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसह सर्व शासकीय यंत्रणांनी सहभाग घेऊन अतिसार थांबवा (स्टॉप डायरिया) या अभियानाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT