Ashok Kataria esakal
नाशिक

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

Crime News : उपनगर पोलिस ठाण्यात ९९ लाखांच्या फसवणुकीसह एमपीआयडी अंतर्गत दाखल गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Ashok Kataria Fraud Case : उपनगर पोलिस ठाण्यात ९९ लाखांच्या फसवणुकीसह एमपीआयडी अंतर्गत दाखल गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कटारिया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे उपनगर पोलिसांकडून कटारिया यांच्या अटकेची शक्यता असून, दुसरीकडे कटारिया यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याचीही शक्यता आहे. (Nashik Ashok Kataria pre arrest bail rejected)

मनोज लेखराम हरियानी यांच्या फिर्यादीनुसार, कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा, अशोका ग्रुपचे अशोक कटारिया, अनुप कटारिया, सतीश पारख (सर्व रा नाशिक) यांच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यामध्ये ९९ लाख रुपयांच्या फसवणुकीसह एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याप्रकरणात कटारिया यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी (ता. २९) अंतिम सुनावणी होऊन, त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे कटारिया यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. तर, याच गुन्ह्यात नरेश कारडा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच न्यायालयाने फेटाळला आहे. (Latest Marathi News)

यामुळे कटारिया यांच्या अटकेची शक्यता आहे. मात्र त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धाव घेतल्याची शक्यता आहे. याबाबत अद्यापपर्यंत पोलीसांकडे माहिती नसल्याचे समजते. मात्र कटारिया यांच्या अडचणी वाढल्याचे आता बोलले जात आहे.

‘या’ गुन्ह्यातही धाव

दरम्यान, मनोहर कारडा यांच्या आत्महत्त्येप्रकरणी दाखल गुन्ह्यातही अशोक कटारिया यांचा संशयितांमध्ये समावेश आहे. या गुन्ह्यातही कटारिया यांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यात कटारिया यांना दिलासा मिळतो का, याकडे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War Ceasefire: ''इराणने अमेरिकेवर डागलेल्या शंभराहून अधिक मिसाईल्स पाकिस्तानी'', शांतिदूत समजणाऱ्या पाकचे निघाले वाभाडे

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT