पान चार
-----------------
प्राणघातक हल्ल्यातील संशयितांना अटक
न्यायालयातून तिघांना रविवारपर्यंत पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, जुने नाशिक, ता. १३ : त्र्यंबक नाका सिग्नल परिसरात सोमवारी (ता. १२) रात्री रिक्षात प्रवासी भरण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत रक्तरंजित राडा झाला. संशयितांनी दोघा तरुणावर हत्यारे व दगडाने प्राणघातक हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या गुंडाविरोधी पथकाच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे तरुणाचे प्राण वाचले. याप्रकरणी पोलिसांनी जागेवर दोन व तिसऱ्या संशयितास मंगळवारी (ता.१३) ताब्यात घेतले. या सर्व संशयितांना न्यायालयाने रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पवन गोविंदा पाटील (वय २५, रा. रामदास गार्डनच्या मागे, शरणपूर रोड, नाशिक), राहुल लहू सोनवणे (वय २५, रा. वडनेर दुमाला, देवळाली कॅम्प रोड, नाशिक), अरुण कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून, जगदीश गायकवाड हा अद्यापही पसार आहेत.
मंगळवारी रात्री त्र्यंबक नाका सिग्नलजवळ प्रवासी भरण्यावरून रिक्षाचालक व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर पाहता पाहता तुफान हाणामारीत झाले. संशयितांनी प्रेम हिरे आणि त्याचा मित्र रोहित पाटील यांना बेदम मारहाण करत हत्यारे, दगडाने जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
------------
वाहतूक पोलिस धावले
त्याचवेळी गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोललिस उपनिरीक्षक सुनील आडके व अंमलदार गुरू गांगुर्डे हे त्या परिसरातून जात होते. सिग्नलवरील गोंधळ आणि घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे व हवालदार चव्हाण यांच्या मदतीने दाेघा संशयितांना जागीच पकडत जखमी प्रेम हिरे याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले.
मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी दीपक संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून चार संशयितांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला, हत्यारांचा वापर यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.