Communist Party of India esakal
नाशिक

Assembly Election : राज्यात ‘भाकप’चा 15 जागांवर दावा; राज्यस्तरीय बैठक

Assembly Election : नाशिकमध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यात ‘भाकप’ला किमान १५ जागा मिळाव्यात, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची नाशिकमध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यात ‘भाकप’ला किमान १५ जागा मिळाव्यात, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधून जागावाटपाचा प्रश्‍न सोडविण्यात येणार आहे. दरम्यान, कुठल्या जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवायची, याविषयीचा अंतिम निर्णय समिती बुधवारी (ता. २४) घेणार आहे. (BCP claims 15 seats in State level meeting )

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिल सदस्यांचे तीनदिवसीय अधिवेशन मंगळवार (ता. २३)पासून नाशिक शहरातील राणेनगर येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कार्यालयात सुरू झाले आहे. ‘भाकप’चे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो, राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, सहसचिव डॉ. राम बाहेती, सहसचिव राजू देसले, तुकाराम भस्मे, नामदेव चव्हाण, स्मिता पानसरे, शिवकुमार गणवीर, प्रकाश रेड्डी, सुकुमार दामले, राजन क्षीरसागर, श्याम काळे अधिवेशनात सहभागी आहेत. (latest marathi news)

मंगळवारी दिवसभर झालेल्या बैठकीत प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. यात जिल्ह्यानिहाय जागांचे प्रस्ताव समितीकडे प्राप्त झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी राज्यात इंडिया आघाडी मजबूतपणे लढली पाहिजे. यादृष्टीने महाविकास आघाडीने घटक पक्षांना विश्‍वासात घेऊन त्यांनाही विधानसभेच्या जागा दिल्या पाहिजे, असा सूर मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला. राज्यातील कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवायची, याबाबतचा निर्णय बुधवारी होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. जातीनिहाय जनगणना करा व आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर वाढवण्यासाठी लवकरच राज्यभर आंदोलन झाले. त्याचा पुढील टप्पा ठरविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल यांची शतकी खेळी! विक्रमांचा पाडला पाऊस, २००७ नंतर घडला मोठा पराक्रम

Crime News: लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीत लावला छुपा कॅमेरा, पत्नीसोबतच्या खाजगी क्षणाचे व्हिडिओ दुबईतील मित्रांना पाठवले अन्...

KBC 17 मध्ये विचारला रामायणाबद्दल सोपा प्रश्न, स्पर्धक विचारच करत राहिली; तुम्ही लगेच उत्तर देऊ शकाल का?

Latest Marathi News Live Update: सुरत हायड्रोजन रेल्वे साइटवर केंद्रीय मंत्रींची पाहणी

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

SCROLL FOR NEXT