Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानात जिल्ह्यात एक लाख ३० हजार नवीन मतदार वाढले आहेत. त्यांची प्रारूप मतदारयादी मंगळवारी (ता. ६) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर चार दिवस हरकती नोंदविता येणार आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आवश्यक जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी जिल्हा निवडणूक विभागाने तयार केली आहे. ()
जिल्ह्यात एकूण ४८ लाख ७८ हजार ४५० मतदार आहेत. ३० ऑगस्टला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी २३ जानेवारी २०२४ ला प्रसिद्ध यादीनुसार ४७ लाख ४८ हजार १५३ मतदारांची नोंद करण्यात आली. याच तुलनेत यंदा एक लाख ३० हजार २९७ नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे.
१८० मतदान केंद्रे वाढले
मतदारांची संख्या झपाट्याने वाढत असताना मतदान केंद्रेही वाढली आहेत. जिल्ह्यात एकूण चार हजार ७३९ मतदान केंद्रे आहेत. यात आता १८० मतदान केंद्रे वाढली असून, एकूण चार हजार ९१९ मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. यात नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक ४१३, तर सर्वांत कमी देवळाली २७९ मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यात आठ हजार ८६६ सैन्यदलातील मतदार आहेत. मतदारांच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात टक्केवारी पाहता ७१.३ टक्के पुरुष, तर ७१.८६ टक्के स्त्री मतदार आहेत. (latest marathi news)
युवक मतदारांचा सहभाग
नवमतदारांमध्ये १८ ते १९ वर्ष वयोगटांतील ८४ हजार ३५, तर २० ते २९ वर्ष वयोगटांतील नऊ लाख ५१ हजार ८०४ मतदार आहेत. यात २३ जानेवारीनंतर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत १८ वर्ष वयोगटांतील २४ हजार ७२१, तर २० ते २९ वर्ष वयोगटांतील ६७ हजार ६१ मतदारांची वाढ झाली आहे.
विशेष मोहीम सुरू
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात शनिवार १० ऑगस्ट , रविवार ११ ऑगस्ट, शनिवार १७ ऑगस्ट, रविवारी (ता. १८) नावनोंदणीसाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. ६ ऑगस्ट ते २० ऑगस्टदरम्यान दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. २९ ऑगस्टपर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिद्धासाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई, तर ३० ऑगस्टला अंतिम यादीची प्रसिद्धी करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.