Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : ओझरला एकाच्या डोक्यात कोयता मारुन, चाँपरने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

Nashik Crime : डोक्यात कोयत्याने व पोटात चाँपरने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन इतर मित्रांना मारहाण केली असल्याची घटना ओझर येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

ओझर : येथील एक जण मित्रासह हॉटेलमध्ये बसलेले असताना मोबाईलवरील गाण्याचा आवाज कमी करा असे शेजारच्या टेबलवर जेवणासाठी बसलेल्याना एका मित्राने सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी कुरापत काढून शिवीगाळ केली त्यानतर शिवीगाळ करु नका असे म्हटल्यावर एका जणाच्या डोक्यात कोयत्याने व पोटात चाँपरने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन इतर मित्रांना मारहाण केली असल्याची घटना ओझर येथे घडली. (attempt to kill Over by putting onion on head with chopper)

शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास अविनाश भास्कर लुटे राहाणार खालचा माळीवाडा ओझर हे व त्यांचे मित्र केशव वाघ, गणेश साळी, विशाल नवगिरे हे जेवण करण्यासाठी संजय पगार यांचे मळ्यासमोर ओझर - सायखेडा रोडलगत असलेल्या गंमत जंमत हॉटेलवर बसलेले असतांना शेजारच्या टेबलावर जेवणासाठी बसलेल्या संदेश घोरपडे, दादाराव, अश्पाक पुर्ण नाव माहीत नाही रा. पंचशीलनगर, ओझर यांना मित्र केशव वाघ यानी मोबाईलवरील गाण्याचा आवाज कमी करा असे सांगितले असता या बोलण्याचा राग आल्याने दादाराव याने तुम्ही काय आमचे वाकडे करणार अशी कुरापत काढुन शिविगाळ केली.

अविनाश लुटे त्यांना म्हणाले शिविगाळ करु नका तेंव्हा अश्पाक याने लुटेला हाताच्या चापटीने मारहाण केली व दादाराव याने फोन करुन त्यांचे ७ ते ८ अनोळखी साथीदारांना त्याठिकाणी बोलावुन घेतले लुटे यांनी पण त्याचा भाऊ गणेश लुटे यास त्या ठिकाणी बोलाविले . गणेश लुटे व अविनाश लुटे हे त्यांना समजावुन सांगत असतांना वरील लोकांनी अविनाश याचेसह गणेश लुटेला हॉटेलच्या गेटजवळ ओढत नेले तेथे गणेश लुटे यास दादाराव याचे साथीदारांनी पकडुन ठेवले व दादाराव याने त्याचे हातातील कोयता गणेश लुटे याचे डोक्यात मारुन जबर दुखापत केली, दादाराव हा अश्पाक यास म्हणाला की, याचेपैकी एकाचा गेम करु टाकु तेंव्हा अश्पाक याने त्याचे कमरेला खोचलेला धारदार चॉपर गणेश लुटे याचे डावे बाजुस पोटात खुपसुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

संदेश घोरपडे याने अविनाशच्या उजवे डोळ्याचे वर फरशीचा तुकडा मारुन दुखापत करुन हाताच्या बुक्क्यांनी तोंडावर फाईट मारुन ओठास दुखापत केली तसेच ईतर 7 ते 8 लोकांनी अविनाश व त्याचे तसेच सोबतच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली म झटापटीत अविनाशचे टी शर्ट फाडुन नुकसान करत आमच्या नादी लागले तर तुमचा गेम करुन टाकु असा दम दिला असल्याची तक्रार अविनाश लुटे यांनी नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी संदेश घोरपडे याचे सह १० ते११ जणा विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलिस निरिक्षक अरुण धनवडे यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरिक्षक युगंधरा केंद्रे या करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने महिलांमध्ये खळबळ

तुझे न्यूड फोटो पाठवशील का? अक्षय कुमारच्या १२ वर्षाच्या मुलीला आला घाणेरडा मेसेज; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं

Cough Syrup Deaths : 'कफ सिरप'ने घेतला 12 बालकांचा जीव, पाच मुले गंभीर; औषधात आढळला विषारी घटक, नागपूर प्रयोगशाळेत झाली महत्त्वाची चाचणी

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

SCROLL FOR NEXT