नाशिक

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी ‘अटेंडन्स अ‍ॅप’

CD
NSK26H33827 नाशिक ः ग्रामपंचायत विभागाच्या अटेंडन्स ॲपचे उदघाटन करताना विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम. समवेत सीईओ ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ. … ग्रामपंचायत अधिकारींना आता ‘अटेंडन्स अ‍ॅप’ नाशिक, ता.२८ : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी ‘अटेंडन्स अ‍ॅप’ विकसित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले. अ‍ॅपमध्ये चेहऱ्याची ओळख या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद अधिक अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने करता येणार आहे. प्रत्येक उपस्थिती नोंदीसोबत छायाचित्र आणि वेळेची नोंद उपलब्ध राहणार असल्याने उपस्थिती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यास मदत होणार आहे. उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, विहंग देशमुख, चंद्रा बॅनर्जी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. या प्रणालीमुळे अधिकाऱ्यांच्या कामकाजातील नियमितता, शिस्त आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना विविध शासकीय सेवा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. मोबाईलवर वापरता येणाऱ्या या अ‍ॅपमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने बायोमेट्रिक लॉकची सुविधा देण्यात आली आहे. इंटरनेट उपलब्ध नसतानाही अ‍ॅप वापरण्याची सुविधा असल्याने ग्रामपंचायत स्तरावर उपस्थिती नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT