Teachers Award esakal
नाशिक

Teachers Award : राज्यातील कर्तृत्ववान शिक्षकांना पुरस्कार! राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

Nashik News : शिक्षक ध्येय व सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यातर्फे राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शिक्षक ध्येय व सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यातर्फे राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर ही स्पर्धा होत असून, शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. (Award to accomplished teachers in state)

राज्यात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगती करीत आहे. शाळेतील शिक्षणप्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. या त्यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी, याच हेतूने या स्पर्धा होत आहेत.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे. राज्यातील शिक्षकांमधून दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे. यात प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी) व माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (आठवी ते पदवीपर्यंत) असेल. पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षणपद्धतीत सुधारणा घडविणे.

नावीन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापनपद्धती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. (latest marathi news)

राज्यातील शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी तसेच शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे कार्य करणाऱ्या संस्था या सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

उपक्रम अहवाल लेखनाबाबत सविस्तर माहितीसाठी शिक्षकांनी https://kaushalyavikas.blogspot.com किंवा https://shikshakdhyey.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. शिक्षकांनी आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनविताना तो मराठी.

हिंदी किंवा इंग्रजीत एम. एस. वर्ल्ड टायपिंग करून नंतर त्याची पीडीएफ करून ९६२३२३७१३५ या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावी. स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क असून, उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे. स्पर्धेचा निकाल ५ सप्टेंबर २०२४ ला ‘शिक्षकदिनी’ जाहीर करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT