Bad condition of Vilholi road
Bad condition of Vilholi road esakal
नाशिक

Nashik Road Damage : अंबड MIDC रस्त्याची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा

Nashik Road Damage : असंख्य छोट्या- मोठ्या कंपन्या असणाऱ्या विल्होळी ते अंबड एमआयडीसीकडे जाणाऱ्या लिंक रोडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने या ठिकाणी असलेल्या चार ते पाच हजार कामगारांचा प्रवास गेल्या वर्षानुवर्षे खडतर बनला आहे. शेकडो उद्योजकांनी अनेकदा आंदोलने केले. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही रस्त्याची परिस्थिती जैसे थे असल्याने कामगार वर्गासह उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Nashik Bad condition marathi news)

विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर या ठिकाणी काही लाखो रुपये खर्च करून कच्चा स्वरूपात तयार करण्यात आलेला रस्ता पूर्णतः व खराब झाल्याचे चित्र आहे. विल्होळी येथील हॉलिडे हॉटेल येथून ते अंबड एमआयडीसीकडे जाणाऱ्या लिंक रोड दरम्यान शेकडो कंपन्या व छोटे-मोठे लघुउद्योजक आहेत.

४ हजारहून अधिक महिला व पुरुष कामगार काम करतात. तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नाही. मालवाहतूक करणारी वाहनेदेखील या ठिकाणी येताना उद्योजकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. नियमित छोटे- मोठे अपघात घडतात. लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी दखल घेत रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी उद्योजकांसह कामगार वर्गाने केली आहे.

रस्त्याची दुरवस्था होऊन कामगारांना वाहने चालवणे मुश्कील झाले आहे. रात्री अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे कामगार, महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. छोटे-मोठे मध्यम तसेच लघुउद्योग असतानाही प्रशासनाकडून रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असून प्रतिनिधी केवळ आश्वासन देत आहे. (latest marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT