Accident Death News esakal
नाशिक

Nashik Bardan Fata Accident Case: महिलेचा चिरडणारा मद्याच्या नशेत होता चिंग! वैद्यकीय रिपोर्ट पॉझिटिव्ह; 5 दिवसांची कोठडी

Crime News : अर्चना किशोर शिंदे (३१, रा. शिवाजीनगर, सातपूर) असे मयत महिेलेचे नाव आहे. तर अटक करण्यात आलेला मद्यपी कारचालकाचे देवचंद रामू तिदमे (५१, रा. कृष्णा रेसीडेन्सी, ध्रुवनगर) असे नाव आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bardan Fata Accident Case : आनंदवल्ली परिसरातील हॉटेलमधील काम उरकून घराकडे परतणाऱ्या पादचारी महिलेला ज्या कारने धडक देत चिरडून ठार केले, त्या कारचा चालक मद्याच्या नशेमध्ये चिंग होता. त्याचा वैद्यकीय अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. न्यायालयात या संशयित कारचालकाला सोमवारपर्यंत (ता. १५) पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी (ता. ९) सायंकाळी बारदान फाटा येथे अपघाताची घटना घडली होती. (Nashik Bardan Fata Accident Case)

अर्चना किशोर शिंदे (३१, रा. शिवाजीनगर, सातपूर) असे मयत महिेलेचे नाव आहे. तर अटक करण्यात आलेला मद्यपी कारचालकाचे देवचंद रामू तिदमे (५१, रा. कृष्णा रेसीडेन्सी, ध्रुवनगर) असे नाव आहे. मंगळवारी (ता. ९) सायंकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास अर्चना शिंदे या घरी परतत असताना साधना मिसळसमोर भरधाव वेगात आलेल्या अल्टो कारने (एमएच ०३ बीई ६६३४) शिंदे यांना पाठीमागून जोरदार धडक देत पसार झाला होता. यात गंभीर मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. (latest marathi news)

संशयित कारचालक देवचंद तिदमे याचे घरात वाद झाल्याने तो त्याच्या गावी निघून गेला होता. दुपारी मद्यपान करून घराकडे परतत असताना त्याने सदरचा अपघात केल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तिदमे यास अपघातानंतर तासाभरात अटक करण्यात आली. वैदयकीय तपासणीमध्ये त्याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता, त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune News : बालगंधर्वच्या आवारात हॉटेलचे पार्किंग; हॉटेल व्यावसायिकाने ठेकेदाराला केले मॅनेज

Hyundai Salary Hike : ह्युंदाई कर्मचाऱ्यांना नवरात्रीची मोठी भेट, मिळाली 'इतक्या' हजारांची भरघोस पगारवाढ

SCROLL FOR NEXT