nashik city esakal
नाशिक

नाशिक : झिरो कार्बन मोहिमेत देशातील पहिले नॉन मेट्रो शहर!

विक्रांत मते

नाशिक : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्‍वभूमीवर कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी महापालिकेने जागतिक रेस टू झिरो मोहिमेत सहभाग घेतला आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नुकतीच करारावर स्वाक्षरी केल्याने नेट झिरो कार्बन मोहिमेत सहभागी होणारे नाशिक देशातील पहिले नॉन मेट्रो शहर ठरले आहे.

अशी आहेत मोहिमेची उद्दिष्टे...

वाढत्या शहरांमध्ये कार्बनचे प्रमाण कमी करताना शाश्‍वत व पर्यावरण स्नेही विकासावर भर देण्यासाठी देश पातळीवर नेट झिरो कार्बन मोहिम राबविली जात आहे. त्यात नाशिक महापालिकेने समावेश होण्यासाठी मे महिन्यात डिजिटल स्वाक्षरी करण्यात आली होती. मोहिमेत सहभागी होण्यासाठी महापालिकेने शहरात सायकल कल्चर वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट रस्त्यावर सायकल ट्रॅक विकसित करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शहर बससेवा सुरू करणे, सीएनजी व इलेक्ट्रिकल बस रस्त्यावर उतरविणे, वाहतूक बेटांची निर्मिती करणे, सौर उर्जा निर्मिती आदी उपक्रम राबविले जात आहे. या मोहिमेला प्रोत्साहन मिळावे म्हणून नेट झिरो कार्बन मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त जाधव यांनी नुकतीच दस्तांवर स्वाक्षरी केली.

२०५० पर्यंत शहराला कार्बन मुक्त करणार...

संयुक्त राष्ट्र क्लायमेट चेंज अंतर्गत रेस टू झिरो मोहिमेत सहभागी होताना सन २०५० पर्यंत शहराला कार्बन मुक्त करणे, सन २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण पन्नास टक्क्यांवर आणणे, शहराच्या कुठल्याही भागात अर्धा तासात पोहोचण्यासाठी रस्त्यांचा विकास करणे, सन २०२५ पर्यंत झिरो कार्बन उत्सर्जन बसेस रस्त्यावर उतरविणे हे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांची बैठक ग्लासगो यथे होणार आहे.

Clean Air प्रोग्राम अंतर्गत वीस कोटी

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने क्लिन एअर प्रोग्राम अंतर्गत महापालिकेने हवेतील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविलेल्या विविध उपाययोजनांचे स्वागत करताना वीस कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. प्राप्त रक्कमेतून नाशिक, पंचवटी, पंचक व मोरवाडी अमरधाम मध्ये विद्युत दाहिनी बसविली जात आहे. महापालिकेच्या कार्बन कमी करण्याच्या या प्रयत्नांचा भाग म्हणून नॉन मेट्रो शहराच्या क्रमवारीत नेट झिरो कार्बन मोहिमेत सहभागी झाले आहे.

''मिशन झिरो कार्बन हे युनायटेड नेशनची मोहिम आहे. त्यात सन २०५० पर्यंत शहर कार्बन न्युट्रल करणे हा उद्देश आहे. या मोहिमेत सहभागी होणारे नाशिक हे देशातील पहिले नॉन मेट्रो शहर आहे. या उपक्रमांतर्गत पर्यावरण व हवेची गुणवत्ता सुधारणे, प्रदूषण कमी केले जाणार आहे. यासाठी लोकसहभाग महत्वाचा ठरेल.'' - कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT