BEd CET esakal
नाशिक

BEd CET : बी.एड. सीईटीला प्रवेश नाकारला; विद्यार्थिनी संतप्त

BEd CET : पंचवटीतील एका परीक्षा केंद्रावर नियोजित बी.एड. अभ्यासक्रमाच्‍या सीईटी परीक्षेला प्रवेश नाकारल्‍याने विद्यार्थिनींकडून संताप व्‍यक्‍त करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

BEd CET : पंचवटीतील एका परीक्षा केंद्रावर नियोजित बी.एड. अभ्यासक्रमाच्‍या सीईटी परीक्षेला प्रवेश नाकारल्‍याने विद्यार्थिनींकडून संताप व्‍यक्‍त करण्यात आला. सोमवारी (ता. ४) सकाळी घडलेल्‍या या प्रकारानंतर प्रवेश नाकारलेल्‍या विद्यार्थिनींनी गर्दी करताना पुनर्परीक्षेची मागणी केली. तक्रारकर्त्या विद्यार्थिनींनी दिलेल्‍या माहितीनुसार, त्‍यांना प्राप्त झालेल्‍या प्रवेशपत्रानुसार ही परीक्षा सोमवारी (ता. ४) सकाळी साडेआठला होती. (nashik BEd CET admission marathi news)

परीक्षा केंद्र आडमार्गी असल्‍याने अनेक विद्यार्थ्यांना विशेषतः महिला, युवतींना या केंद्रापर्यंत पोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. कसेबसे केंद्रात दाखल झाल्‍यानंतर अवघ्या दोन मिनिटांचा विलंब झालेला असताना केंद्र व्‍यवस्‍थापनाकडून या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला. अनेक वेळा विनंती करूनही परीक्षा देण्याची संधी न दिल्‍याने वर्ष वाया गेल्‍याची भावना या विद्यार्थिनींनी बोलून दाखविली.

आधीच चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम असताना, एक वर्ष वाया गेल्‍याने शिक्षणक्रम पूर्ण करण्यास विलंब होईल. त्‍यातही महिला, मुलींना करिअरच्‍या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे असल्‍याने त्‍यांच्‍यावर अन्‍याय झाल्‍याची प्रतिक्रिया या विद्यार्थिनींनी दिली. कुठलीही चुकी नसताना केंद्र व्‍यवस्‍थापनाच्‍या आडमुठेपणामुळे परीक्षेपासून मुकावे लागले असल्‍याची भावना व्‍यक्‍त करताना पुन्‍हा परीक्षा देण्याची संधी सीईटी सेलने द्यावी व पुढील वेळी इतर परीक्षा केंद्राचा पर्याय द्यावा, अशी मागणी केलेली आहे. (latest marathi news)

पालकांकडूनही संताप व्‍यक्‍त

विद्यार्थिनींसोबत आलेल्‍या पालकांनीही संताप व्‍यक्‍त केला. यापूर्वीही गेल्‍या वर्षी याच परीक्षा केंद्रावर पार पडलेली परीक्षा वादग्रस्‍त ठरली होती. त्‍यामुळे केंद्रावर कारवाई करण्याची मागणी या पालकांनी केली आहे.

‘संस्‍थेचा वादाशी संबंध नाही’

परीक्षेतील गोंधळाच्‍या अनुषंगाने संबंधित शैक्षणिक संस्‍थेने माहिती जारी केली आहे. शैक्षणिक संकुलाच्‍या जागेत खासगी आयटी कंपनी कार्यरत असून, त्‍यांना या ठिकाणी जागा उपलब्‍ध करून दिलेली आहे. त्‍यामुळे परीक्षा केंद्राचे सर्व नियोजन संबंधित कंपनीतर्फे केले जाते. त्‍यामुळे सोमवारी सकाळी घडलेल्‍या प्रकारात संबंधित कंपनीच्‍या अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला. या संपूर्ण प्रकाराशी या शैक्षणिक संस्‍थेचा कुठलाही संबंध नसल्‍याचे या शैक्षणिक संस्‍थेचे म्‍हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT