Betting Crime esakal
नाशिक

Nashik Betting Crime: आयपीएल सामन्यावर सट्टा! एकाला अटक; गुन्हेशाखेच्या विशेष शाखेची कारवाई

Crime News : बुधवारी (ता. ३) कोलकाता विरुद्ध दिल्ली या सामन्यामध्ये बेटींग लावणाऱ्या संशयितास विशेष पथकाने सट्टेबाजी करताना अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सध्या आयपीएल टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. रोमांचक होणाऱ्या या स्पर्धेत बुधवारी (ता. ३) कोलकाता विरुद्ध दिल्ली या सामन्यामध्ये बेटींग लावणाऱ्या संशयितास विशेष पथकाने सट्टेबाजी करताना अटक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Betting Crime IPL match news)

महेंद्र अशोक वैष्णव (३४, रा. लक्ष्मी अपार्टमेंट, लामखेडा मळा, तारवाला नगर, पंचवटी) असे संशयित सट्टेबाजाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषीनगर जॉगिंग ट्रॅकसमोर आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी सुरु असल्याची माहिती विशेष पथकाचे अंमलदार दत्तात्रय चकोर यांना मिळाली होती.

त्यानुसार, पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बुधवारी (ता.३) रात्री संशयित महेंद्र यास रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून मोबाइल, रोकड व कार असा १६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (latest marathi news)

संशयित महेंद्र हा मोबाइलवर आयपीएल सामना पाहून सट्टा लावत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पथकाचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, चकोर आदींच्या पथकाने बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT