A waterfall near the source of Bham Dam. Tourists enjoying the water under the waterfall in the last photo. esakal
नाशिक

Bhandardara Dam: भंडारदरा धरण ठरतेय नाशिककरांचे वन डे डेस्टिनेशन! पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्रबिंदू, सलग सुट्यांमुळे गर्द

Latest Tourism News : शनिवार-रविवारसह गणेश चतुर्दशीच्या सलग सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. गर्दीमुळे कोणताही त्रास होऊ नये म्हणून राजूर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : नाशिककरांचे वन डे डेस्टिनेशन आणि पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले भंडारदरा धरण महिनाभरापासून भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिमझिम सुरू आहे. दरम्यान घाटघर-भंडारदरा परिसरातील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

शनिवार-रविवारसह गणेश चतुर्दशीच्या सलग सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. गर्दीमुळे कोणताही त्रास होऊ नये म्हणून राजूर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. मध्यंतरी पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने परिसरातील धबधबे, ओढे, नाल्यांचे पाणी कमी झाले आहे. (Bhandardara Dam attraction in terms of tourism)

भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी भंडारदऱ्यासह इगतपुरी तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अधूनमधून हलक्या सरींचा अपवाद वगळता पावसाने विश्रांती घेतल्याने तालुक्यातील निसर्गाचे सौंदर्य बहरले आहे.

डोंगरदऱ्यांतून खळखळत वाहणारे झरे, कड्या कपाऱ्यांवरून वाहणारे धबधबे. भात खचरामध्ये साचलेले पाणी, पर्वत रांगावरील वृक्षवेलींनी नटलेला सह्याद्री, झाडाझुडपांमधून हळूच येणारा पक्ष्यांचा आवाज आणि वाहणारा वारा पर्यटकांना मोहिनी घालत आहे.

यामुळे पर्यटकांची पावले निसर्गाकडे वळत आहे. भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा, सांधनदरी, घाटघर प्रकल्प, रतनगड, कळसूबाई, हरीश्‍चंद्रगड, फोपसंडीचा निसर्ग डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील सात धरणांवर चार जिल्ह्यांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. यंदा इगतपुरीसह घाटमाथ्यावर व तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. आज १९ सप्टेंबरअखेर तालुक्यात एकूण तीन हजार ३५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा पावसाने सरासरी वेळेपूर्वीच गाठली आहे.

इगतपुरीत खऱ्या अर्थाने पावसाला जुलैच्या मध्यात सुरुवात झाली. पाऊस उशिरा आल्याने सरासरी गाठतो की नाही, याची चिंता होती. मात्र पावसाने दोन महिन्यांत वार्षिक सरासरीकडे वाटचाल केली. गेल्या महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने तीन हजार ३५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळे भावली, दारणा, मुकणे, वैतरणा, कडवा, वाकी खापरी, भाम धरणे भरली आहेत. (latest marathi news)

पाऊस सरासरीच्या अंतिम चरणात

महिनाभरात इगतपुरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी आहे. पूर्व भागात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भातशेतीला खत देणे, निंदणीसह उर्वरित कामांना वेग आला आहे. पश्चिम पट्ट्यातील डोंगरावरून धबधबे कोसळत आहेत.

दारणा, भाम व वाकी नद्या वाहत आहेत. इगतपुरी, घोटी, मानवेढे, वैतरणा, धारगाव या भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. दरम्यान तालुक्यात दर हंगामात तीन हजार २०० ते तीन हजार ७०० मिलिमीटरपर्यंत पाऊस होतो. आजअखेर ३ हजार ३५० मिलिमीटर पाऊस झाल्याने पाऊस यंदाही शंभर टक्के सरासरी गाठेल, असे वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्ता वाढणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय प्रस्तावित

October 2025 Calendar: दसरा ते दिवाळी, यंदा ऑक्टोबर महिन्यात कोणते महत्त्वाचे सण आहेत? वाचा एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : सतेज पाटील यांना लाडकी बहीण योजना आवडली नाही? म्हणाले, योजनेने आमचा कार्यक्रम केला

Latest Marathi News Live Update: गुंड निलेश घायवळच्या घरातील सदस्य गायब

७०० + विकेट्स अन् १५ हजार धावा... ; महान क्रिकेटपटू त्याच्याच देशासाठी झाला परका! क्रीडा मंत्रालयाने घातली बंदी

SCROLL FOR NEXT