Conceptual drawing of the proposed building of the Maratha Hostel esakal
नाशिक

Nashik : मराठा वसतीगृह इमारतीचे उद्या मुख्यमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन

Nashik : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात भाजप आमदारांकडून विविध विकासकामांचे उद्‌घाटने प्रस्तावित करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात भाजप आमदारांकडून विविध विकासकामांचे उद्‌घाटने प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मराठा समाजाच्या प्रत्येकी ५०० मुला-मुलींना सामावून घेणारे वसतीगृह व छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (ता. २८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. ( Bhumi Pujan of Maratha hostel building tomorrow by Chief Minister )

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून त्र्यंबक रोडवरील दूध डेअरीच्या जागेवर मराठा समाजाच्या मुलांसाठी वसतिगृहाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी १५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वसतीगृहात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक गरजांची पूर्तता होईल. शुद्ध पाणी, इंटरनेट सेवा, ग्रंथालय, सुरक्षितता, स्वच्छता, आहार, मनोरंजन, खेळ वसतीगृहात असेल. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र समुपदेशाकाची नियुक्ती केली जाणार आहे. (latest marathi news)

''वसतिगृहाच्या निमित्ताने शहरात शिक्षण घेण्याची आणि त्यासाठी रहिवास मिळण्याची मोठी अडचण दूर होणार आहे. मराठा समाजातील गरीब घटकांतील मुले शिक्षणाच्या प्रवाहात राहणार आहेत. वसतिगृहाच्या माध्यमातून समाजातील अनेक गुणवंतांना प्रोत्साहन मिळेल.''- प्रा. देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य.

वसतिगृहाबाबत महत्त्वाचे

- ३०० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका.

- ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत.

- लिफ्टची व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सीसीटीव्ही कॅमेरे.

- प्रशस्त मीटिंग हॉल

- वसतीगृह परिसरात उद्यान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live in relationship: प्रियकराने मृतदेहाचे केले सात तुकडे; पाय अन् डोके गायब; 'लिव्ह-इन'मुळे दुर्दैवी अंत!

VIRAL VIDEO: शिक्षिकेचा भन्नाट अंदाज! गाण्याच्या तालावर शिकवला मुलांना 'गुड टच-बॅड टच' धडा! कसा ते एकदा बघाच! व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल

Hartalika 2025 : यंदाची हरतालिका ठरणार या राशींसाठी शुभ, गौरी-शंकराची होणार कृपा !

Gadchiroli News : नाला ठरतोय जीवघेणा! पोळ्यासाठी आश्रमशाळेतून घरी आलेल्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू; पाच दिवसांतला चौथा बळी...

Dog Bite : मांजरी खुर्दमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा; लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश

SCROLL FOR NEXT