Girls Birth Rate esakal
नाशिक

Nashik Girls Birth Rate: स्मार्टसिटीमध्ये मुलींचा जन्मदर घटला! वैद्यकीय विभागाचा अहवाल; ऑगस्टमध्ये नीचांकी जन्मदर

Latest Nashik News : महापालिका हद्दीमध्ये मुलींच्या जन्मदरात काही वर्षांपासून किंचित वाढ होत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र चालू वर्षात हे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Girls Birth Rate : नवरात्रोत्सवानिमित्त घरोघरी महिलांची पूजा होत असताना महापालिका हद्दीमध्ये महिलांचे अस्तित्व फक्त पूजे पुरतेच राहते की काय, अशी शंका घेण्यास वाव आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झालेल्या मुला- मुलींच्या जन्मदराच्या अहवालानुसार मुलींचा जन्मदर घटल्याचे वास्तव समोर आले आहे. एक हजार पुरुषांमागे मुलींचे जन्माचे प्रमाण सरासरी ८९८ आढळून आले आहे. ऑगस्ट महिन्यात ८६८ असा नीचांकी मुलींचा जन्मदर आढळून आला आहे. (birth rate of girls decreased in Smart City)

महापालिका हद्दीमध्ये मुलींच्या जन्मदरात काही वर्षांपासून किंचित वाढ होत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र चालू वर्षात हे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. २०१७ मध्ये एक हजार मुलांमागे ९०७ मुलींच्या जन्माचे प्रमाण होते. २०१८ मध्ये एक हजार मुलांमागे ९२३ मुलींचे प्रमाण होते.

२०१९ मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ९२० राहिला. २०२० मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९१२ होते. २०२१ मध्ये एक हजार मुलांमागे ९११ मुली असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. २०२२ मध्ये मुलींच्या जन्मदरात मोठी घसरण होऊन एक हजार मुलांमागे ८८० जन्मदर राहिला. २०२३ मध्ये जानेवारी ते एप्रिल या महिन्यांची आकडेवारी समोर आली. यात एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ८७१ पर्यंत घसरला आहे.

२०२४ मध्ये सप्टेंबरअखेर प्राप्त अहवालानुसार मुलींच्या जन्मदरात घट झाली आहे. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीमध्ये ७५२५ मुले जन्माला आली. त्या तुलनेत ६७६० मुलींचा जन्म झाला. दर हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ८९८ राहिला. ऑगस्ट महिन्यात ८६८ इतका नीचांकी पातळीवर दर घसरला होता. स्मार्टसिटी नाशिकमध्ये मुलींचे जन्मदर घसरण्याचे प्रमाण हे चिंताजनक असून राज्य शासनाकडून घटत्या जन्मदराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. (latest marathi news)

कारणे शोधण्याची आवश्यकता

नाशिकमध्ये साक्षरतेचे प्रमाण राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत बरे आहे. असे असतानाही मुलींचा जन्मदर सातत्याने का घटत आहे, सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भ तपासणी होते का, याची तपासणी करणे गरजेचे आहे. दरम्यान गर्भनिदान किंवा स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचे लक्षात आल्यास महापालिकेच्या संकेतस्थळावर माहिती देण्याचे किंवा १८००२२३३४४७५ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन महापालिकेचे मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले.

गत सहा वर्षांतील जन्मदराची आकडेवारी

वर्ष जन्मदर

२०१९ ९२०

२०२० ९१२

२०२१ ९११

२०२२ ८८५

२०२३ ९१५

२०२४ (ऑगस्ट) ८९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT