sakal
नाशिक

नाशिक: भाजपच्या असंतोषाला राष्ट्रवादीकडून खतपाणी

रस्ते गैरव्यवहारात चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला घरचा आहेर देताना रस्ते खड्डे बुजविण्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपमधील सुंदोपसुंदीत सहभाग घेत खतपाणी घातले आहे. आमदार फरांदे यांच्या मागणीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी स्वागत करताना २५७ कोटींच्या रस्ते गैरव्यवहारात सहभागी असलेल्या पदाधिकाऱ्यांचीदेखील चौकशी केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यास पाठिंबा असेल, असे समर्थन केले.

महापालिकेत भाजपची सत्ता असूनही कामे होत नाही. प्रशासन जुमानत नसल्याची खंत नगरसेवकांसह आमदारांमध्ये आहे. आमदार प्रा. फरांदे यांनी डेंगीवरून आरोग्य विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर रस्त्यांवरील खड्ड्यांवरूनदेखील सत्ताधारी भाजपला घरचा आहेर देताना खड्डे बुजविण्याच्या कामाची चौकशीची मागणी करून ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याबरोबरच अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

आमदार फरांदे यांच्या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत करताना भाजपमधील सुंदोपसुंदीला खतपाणी घातले आहे. शहराच्या हितासाठी फरांदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करताना उशिरा का होईना जाग आल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. आमदार फरांदे यांची मागणी योग्य आहे.

परंतु, त्यात आणखी एका गैरकामाची जोड देणे गरजेचे आहे. २५७ कोटी रुपयांच्या रस्ते कामांमध्ये सहभागी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचीही चौकशीची मागणी करावी, असे आवाहन केले. शहरात २५७ कोटींच्या रस्ते कामाला परवानगी देण्यात आली. रस्त्यावर फक्त डांबर ओतले गेले. पावसामुळे डांबर धुवून गेल्याने कामाचे पितळ उघडे पडले आहे. हे डांबर कुठे गेले याची चौकशी करावी. गुणवत्ता राखली गेली असती तर शहर खड्डेमय झाले नसते असे ठाकरे यांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT