Ashadhi Wari esakal
नाशिक

Sant Nivruttinath Maharaj : यंदाची आषाढीवारी निर्मलवारी करण्याचा संकल्प

Nashik News : यंदाची आषाढीवारी खऱ्या अर्थाने निर्मलवारी करण्याचा संकल्प संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधी ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाने केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शासनाच्या निधीमुळे विश्‍वस्तांसह अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याद्वारे यंदाची आषाढीवारी खऱ्या अर्थाने निर्मलवारी करण्याचा संकल्प संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधी ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाने केला आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. जसजसा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचा पालखी सोहळा जवळ येत आहे, तसतशी वारकऱ्यांची उत्कंठा वाढत आहे. सर्वांना पंढरीचे वेध लागलेले आहेत. (Sant Nivruttinath Maharaj)

कधी एकदा आपण पंढरपूरच्या वारी मार्गावर मार्गस्थ होतो, अशी हुरहूर सर्वांनाच लागली आहे. काही वर्षांपासून निर्मलवारी हा उपक्रम निवृत्तिनाथ संस्थांच्या वतीने हातात घेण्यात आला आहे. वारी मार्गावर होणारी स्वच्छता तसेच वेगवेगळ्या ठिकाणी होणारे वृक्षारोपण प्लॅस्टिक कचऱ्याची लावली जाणारी योग्यपणे विल्हेवाट.

फिरते शौचालय असल्याने दिंडी मार्गावर राहणारी स्वच्छता या सर्व बाबी निर्मलवारीच्या अनुषंगाने दोन वर्षांपासून यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. यंदा गेल्या वर्षीप्रमाणे फिरते शौचालय, वॉटरप्रूफ मंडप, स्नानगृहे देण्यात आली आहेत. आरोग्य पथक असेल. पाणीपुरवठ्याचे टँकर असतील, त्यातल्या पाण्याची शुद्धता असेल या सर्व बाबी वारीच्या प्रस्थानापूर्वी प्रशासनाच्या समन्वयातून साधल्या गेल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने यंदा वीस हजार रुपये महाराष्ट्रातील दिंड्यांना देऊ केले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांच्या मनामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यापूर्वी एवढी दखल कोणी घेतली नव्हती. त्यामुळे निर्मलवारीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (latest marathi news)

निर्मलवारीचा करू संकल्प ः घोटेकर

संत निवृत्तिनाथ पालखी ही उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी आणि राज्यातील तीन नंबरची पालखी आहे. मात्र देहू, आळंदीच्या पालखी सारख्या वारकऱ्यांकरिता सुखसुविधा शासन देत नव्हते. मात्र निर्मलवारी उपक्रमांतर्गत आपल्या पालखीलाही या सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही विश्वस्त मंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटून प्रशासनमार्फत प्रस्ताव पाठवून अथक प्रयत्न केले.

त्याचे फळस्वरूप शासनाने पालखीला २५० फिरती शौचालये, पालखी तळावर वॉटरप्रूफ मंडप, सहा टँकर, रुग्णवाहिका, लाइट, जनरेटर आदी सुविधांसाठी भरीव निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला आहे.

शासनाने विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी संस्थानच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यातूनच या वर्षी आपल्या पालखीला या सुविधा मिळाल्या असून, त्यामुळे या वर्षीची आषाढीवारी चांगल्या प्रकारे निर्मलवारी करण्याचा संकल्प ट्रस्टतर्फे करण्यात आल्याचे विश्‍वस्त ॲड. सोमनाथ घोटेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT