Mukund Sarda esakal
नाशिक

Nashik News : सिन्नरच्या बेपत्ता व्यावसायिकाचा मृतदेह घाटनदेवी जंगलात सापडला

Nashik : बॅटरी व्यावसायिक मुकुंद पुरुषोत्तम सारडा (वय ५०) यांचा मृतदेह तब्बल आठवडाभरानंतर इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवीच्या जंगलात आढळून आला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्या शुक्रवारी (ता. १२) पासून बेपत्ता असलेल्या सिन्नर शहरातील विजयनगर भागात राहणारे बॅटरी व्यावसायिक मुकुंद पुरुषोत्तम सारडा (वय ५०) यांचा मृतदेह तब्बल आठवडाभरानंतर इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवीच्या जंगलात आढळून आला. विषारी औषध प्राशन करून सारडा यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. (Nashik body of missing businessman from Sinnar was found in Ghatandevi forest)

गुरुवारी (ता. १८) दुपारी इगतपुरी पोलिसांना घाटणदेवीच्या जंगलात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याच्या समजले. पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता मुकुंद सारडा यांची ओळख पटली. श्री. सारडा यांचा सिन्नर येथे इलेक्ट्रिकल बॅटरी रिपेरिंग व विक्रीचा व्यवसाय होता. गेल्या शुक्रवारी घरातून दुकानात जातो असे सांगून बाहेर पडले.

मात्र, ते दुकानात पोहोचलेच नाही. तेव्हापासून ते बेपत्ता झाले होते. कुटुंबियांनी सिन्नर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. संपूर्ण आठवडा नातेवाईक व सिन्नर पोलिस त्यांचा सर्वत्र शोध घेत होते. यासंदर्भात इगतपुरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT