property buy esakal
नाशिक

Nashik Dasara Property Shopping: दसऱ्याच्या मुहूर्तावर 900 फ्लॅटचे बुकिंग! परवडणाऱ्या घरांकडे ग्राहकांचा कल; फार्महाऊसला मागणी

Latest Dasara Festival News : समाधानकारक पाऊस, पंतप्रधान आवास योजना तसेच बँकांकडून १२ ते १४ तासात गृहकर्जाची व्यवस्था या तिन्हींचा परिणाम रिअल इस्टेटवर दिसून आला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dasara Property Shopping : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर शहरात मोठ्या प्रमाणात स्वप्नातील घरांचे बुकिंग झाले. जवळपास ९० फ्लॅटचे बुकिंग झाले. त्यात परवडणाऱ्या घरांना अधिक मागणी दिसून आली. समाधानकारक पाऊस, पंतप्रधान आवास योजना तसेच बँकांकडून १२ ते १४ तासात गृहकर्जाची व्यवस्था या तिन्हींचा परिणाम रिअल इस्टेटवर दिसून आला. फ्लॅटबरोबरच ओपन प्लॉट व फार्महाऊसच्या मागणीत वाढ झाली असून, त्याचेही बुकिंग झाले. (Booking 900 flats on occasion of Dasara)

इगतपुरी, त्र्यंबक व्यतिरिक्त दिंडोरी व पेठ रोडला देखील फार्महाऊसच्या प्लॉटला मागणी वाढली. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्याचा काहीसा परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर दिसून आला होता. परंतु यंदा पावसाने जोरदार हजेरी दिल्याने शहरी भागास ग्रामीण भागातही चैतन्याचे वातावरण आहे.

पीकपाणी चांगले झाल्याने त्याचा परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर दिसून आला. जवळपास ९०० हून अधिक फ्लॅटचे बुकिंग शहरांमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर झाले. विशेष करून परवडणाऱ्या घरांना अधिक मागणी दिसून आली. ३० ते ३५ लाखांची परवडणारी घरे विकले गेली.

लक्झरी ऐंशी लाख ते एक कोटींच्या वरचे फ्लॅट ला ग्राहक कमी असले तरी त्याचे बुकिंग समाधानकारक झाले. बँकांकडून तत्काळ लोन मंजूर झाल्याने त्याचाही चांगला परिणाम दिसून येत आहे. पंतप्रधान आवास योजनेत जवळपास १.८० लाख रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे. बँकांपर्यंत नोटिफिकेशन पोचल्याने त्याचाही सकारात्मक परिणाम बुकिंग वर दिसला. (latest marathi news)

प्लॉट खरेदीचा ट्रेंड

दोन वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर, घोटी व इगतपुरी भागात फार्महाऊसला मागणी होती. मात्र यंदा मागणीत वाढ झाली असून पेठ रोड, दिंडोरी रोड या भागातदेखील फार्महाऊसला मागणी आहे. दहा लाख रुपये गुंठा ते ४४ लाख गुंठा असे लोकेशननुसार भाव काढण्यात आले आहे.

"बँकांकडून तत्काळ कर्जाची उपलब्धता, समाधानकारक पावसामुळे ग्रामिण भागातून मिळालेला प्रतिसाद या सर्वांचा परिणाम नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रावर दिसून आला. दिवाळीपर्यंत हाच ट्रेंड कायम राहील."- कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो, नाशिक.

"नवरात्रोत्सवामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले असून नाशिककरांकडून परवडणाऱ्या घरांना पसंती आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शासनाचे सकारात्मक धोरण, या वर्षी पावसाने दिलेली दमदार साथ यामुळे सर्वच क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे."

- सुनील गवादे, अध्यक्ष नरेडको नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Sonawane : पुस्तकी ज्ञानापलीकडची शाळा! अशोक सोनवणे गुरुजींनी घडविले ३००० हून अधिक बालकलाकार

Satara News: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी येताच काळाचा घाला, ८ तासांची चिमुकली पित्याच्या अंत्यदर्शनासाठी | Sakal News

Pune News: इमारतीवरून तोल गेल्याने मुलाचा मृत्यू; पतंग उडविताना कात्रजमध्ये घटना, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा!

Solapur University: शॉकिंग अपडेट! पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब; संशोधनातील आकडे पाहून थक्क व्हाल

Crime News : नोटाबंदीनंतरही ४०० कोटींच्या जुन्या नोटा? घोटी पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT