abu salem esakal
नाशिक

Abu Salem Case : सालेमच्या मैत्रिणीसह दोघांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी

Latest Nashik News : तिघांच्या चौकशीतून अद्याप ठोस असे काहीही माहिती मिळालेली नसली तरी अधिकाऱ्यांकडून तपशीलवार होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी व सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा गँगस्टर अबू सालेम यास भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या मैत्रिणीसह दोघांची सलग दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) च्या पथकांनी कसून चौकशी केली. तिघांच्या चौकशीतून अद्याप ठोस असे काहीही माहिती मिळालेली नसली तरी अधिकाऱ्यांकडून तपशीलवार होत आहे. (Both with abu Salem girlfriend interrogated)

नाशिक मध्यवर्ती कारागृहात जुलै महिन्यापासून अबू सालेम दाखल झाला आहे. गुरुवारी (ता.१०) त्याची मैत्रीण हीना बहार सय्यद (३३, रा. ठाणे) ही मदत चतुर (७४, रा. केनिया) आणि वाहनचालक सुलेमान खोजा (४६, रा. अंधेरी) हे सालेमला भेटण्यासाठी आले होते.

तिघेही एका कारमधून आल्याची खबर मिळताच एटीएसच्या पथकाने कारागृह गाठत तिघांना ताब्यात घेतले होते. गुरुवारी दिवसभर त्यांची चौकशी केली. ही चौकशी शुक्रवारी (ता.११) पुन्हा सुरू केली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी मुंबई येथून एटीएसचे प्रमुख व ‘आयबी’चे पथकही नाशिकमध्ये तिघांच्या चौकशीसाठी दाखल झाले. (latest marathi news)

भद्रकालीतील एटीएसच्या कार्यालयाबाहेर सशस्त्र बंदोबस्त तैनात केला होता. तिघाही संशयितांच्या चौकशीतून अबू सालेम यास भेटण्याचे कारण, त्यांचा सालेमशी संबंध, तसेच त्यांची पार्श्वभूमी याबाबत चौकशी पथकाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न होता. जुलै २०२४ मध्ये अबू सालेम यास तळोजा मध्यवर्ती कारागृहातून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आणले होते. तिघांची उद्याही चौकशी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: लग्नासाठी सोनं घेणार? आधी ही बातमी वाचा! 20 हजारांनी महागलं सोनं; सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर? पाहा ताजा भाव

Wath A Ball! पृथ्वी शॉचा संघर्ष सुरूच... डोळ्यासमोर चेंडू फिरला अन् यष्टिंवर आदळला, हा पठ्ठ्या नुसता पाहत राहिला Video Viral

रितेश देशमुखवर चक्क उधारी! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...'मला त्याची उधारी चुकवायची, प्लीज मदत करा'

Sagar Mali Bodybuilder Death : जगाला ताकद दाखवली पण..., आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर सागर माळी यांचे निधन, मृत्यूचे धक्कादायक कारण समोर

Marathi News Live Updates : ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन

SCROLL FOR NEXT