Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : लाचखोर मनपा सहायक आयुक्ताच्या घरातून रोकड, सोने जप्त

Crime News : नाले बांधकामाचे बिल मंजूर करुन देण्यासाठी ठेकेदाराकडून ३३ हजारांची लाच घेताना मालेगाव महापालिकेचा सहायक आयुक्त सचिन महाले यांना शुक्रवारी (ता. २१) रंगेहाथ अटक करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : मालेगाव महापालिकेतील सहायक आयुक्ताच्या घराची झडती घेतली असता, सुमारे १३ लाखांची रोकड आणि सुमारे ९ लाखांचे १३३ ग्रॅम सोने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे. लाचखोराच्या स्थावर मालमत्तेचाही शोध घेतला जात आहे. नाले बांधकामाचे बिल मंजूर करुन देण्यासाठी ठेकेदाराकडून ३३ हजारांची लाच घेताना मालेगाव महापालिकेचा सहायक आयुक्त सचिन महाले यांना शुक्रवारी (ता. २१) रंगेहाथ अटक करण्यात आली होती. (Nashik Bribe Crime municipal assistant commissioner marathi news)

सचिन सुरेंद्र महाले (५१, रा. वर्धमाननगर, एलआयसी ऑफिस, मालेगाव कँम्प) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. मालेगाव महापालिकेत वरिष्ठ लिपिक असून सध्या त्याच्याकडे कर विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार होता. त्याने महापालिका आयुक्तांचा स्वीय सहायक (पीए) असल्याने, तुमचे बिल तत्काळ मंजूर करुन देतो असे सांगत बांधकाम ठेकेदाराकडून एकूण बिलाच्या चार टक्के रक्कम व बक्षिस मागितल्याचे समाेर आले आहे.

शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी महाले याने लाचेची रक्कम स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. याबाबत किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने महाले यास पाेलीस काेठडी सुनावली आहे. (latest marathi news)

स्थावर मालमत्तेचा शोध

शुक्रवारी महालेविरोधातील सापळा यशस्वी झाल्यानंतर, त्याच्या वर्धमाननगरातील घराची झडती लाचलुचपतच्या पथकाने घेतली. या वेळी पथकास राेख रक्कम, काही चिजवस्तू आढळून आल्या. यात १३ लाख १० हजार २०० रुपयांची रक्कम, साेन्याचे तीन क्वाॅईन, एकूण १३३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. महालेच्या विविध स्थावर व जंगम मालमत्तांचा शाेध घेत असून त्याने ज्ञात स्त्राेतापेक्षा जास्त संपत्ती मिळविली आहे का, याचा सखाेल तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EOL Vehicle: जुन्या वाहनधारकांना मोठा धक्का! १० वर्षांची डिझेल, १५ वर्षांची पेट्रोल कार होणार थेट जप्त; राज्य सरकारचा कडक निर्णय

IND vs PAK :'हस्तांदोलन' न करणे हा भारताने सुरू केलेला मुर्खपणा! Sanjay Manjrekar यांची वादग्रस्त पोस्ट; काहींचा सपोर्ट, तर काही विरोधात; तुमचं काय मत?

Education: अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षणात मूलभूत सुधारणेसाठी तरतूद करा; महायुती सरकारकडे शिफारस

अनैसर्गिक शरीर संबंध, व्हिडिओ बनवला अन्...; ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं १२ वर्षीय मुलासोबत नको ते कृत्य, घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : पालघरच्या एमआयडीसीत कंटेनर कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT