Dr. Tejas Garge esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : लाचखोर डॉ. गर्गेंचा ‘लाचलुचपत’ला गुंगारा! मुंबई उच्च न्यायालयात ‘अटकपूर्व’साठी धाव

Bribe Crime : लाचखोर संचालक डॉ तेजस गर्गे हे गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला गेल्या दोन आठवड्यांपासून गुंगारा देत आहेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : रामशेज किल्ल्याच्या पायथ्याची कंपनी सुरू करण्याकरीता ना-हरकत प्रमाणपत्रासाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाच्या सहायक संचालक व संचालकांनी दीड लाखांची लाच घेतली. याप्रकरणी तत्कालीन लाचखोर संचालक डॉ तेजस गर्गे हे गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला गेल्या दोन आठवड्यांपासून गुंगारा देत आहेत. मात्र, यामुळे लाचलुचपतकडून गुन्ह्याचा तपास रखडला आहे. (Nashik Bribe Crime Dr Garge absconded)

तक्रारदार उद्योजकाच्या फिर्यादीनुसार पुरातत्त्वच्या सहायक संचालक आरती मृणाल आळे, आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे (रा. मुंबई) यांनी लाचेची मागणी केली होती. त्यानुसार ७ मे रोजी दीड लाख रुपये घेताना आळे यांना राहत्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले.

आळे यांची प्रसूती झाल्याने त्यांना नोटीस बजावून चौकशी करण्यात आली. त्यांच्या जबाबानुसार, दीड लाखांची रक्कम गर्गे यांच्या सांगण्यावरुन घेतल्याचे तपासात समोर आले होते. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईपासून लाचखोर डॉ. गर्गे पसार झालेले आहेत.

लाचलुचपत’च्या पथकाने गर्गे यांच्या कुटूंबियांसह मित्रांची कसून चौकशी केली. तसेच, त्यांच्या मुंबईतील घरही सील केले. परंतु, गर्गे यांनी ‘लाचलुचपत’समोर हजर होण्याऐवजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. परंतु न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे. (latest marathi news)

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून पसार असलेले गर्गे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला गुंगारा देत आहेत. तर दुसरीकडे ते अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्नशिल आहेत. मात्र गर्गे लाचलुचपतच्या हाती लागत नसल्याने तपासाला अडथळे येत आहेत.

उच्च न्यायालयात धाव

लाचखोर डॉ. तेजस गर्गे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने १८ तारखेला फेटाळून लावला आहे. यामुळे गर्गे यांनी आता अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गर्गे यांच्या वकिलांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असून, त्यावर येत्या १० जून रोजी सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT