Dr. Tejas Garge Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Tejas Garge Bribe Case: लाचखोर डॉ. गर्गेंना उच्च न्यायालयाचा दिलासा! अटी-शर्तींला अधिन राहून अटकपूर्व जामीन मंजूर

Bribe Crime News : गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेले डॉ गर्गे यांना उच्च न्यायालयाने अटी-शर्तींच्या अधिन राहून अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tejas Garge Bribe Case : दीड लाखांच्या लाचप्रकरणी गुन्हा दाखल असलेले पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे तत्कालीन संचालक संशयित डॉ. तेजस गर्गे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेले डॉ गर्गे यांना उच्च न्यायालयाने अटी-शर्तींच्या अधिन राहून अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (Nashik Bribe crime Dr tejas garge High Courts relief)

३२ वर्षीय उद्योजकाच्या फिर्यादीनुसार, त्यांना पेठरोडवरील रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कंपनी सुरू करायची होती. त्यांनी त्यांनी पुरातत्त्व विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. त्यासाठी पुरातत्त्वच्या सहायक संचालक आरती मृणाल आळे (४१), संचालक तेजस गर्गे यांच्याविरुद्ध दीड लाखांच्या लाचप्रकरणी ७ मे रोजी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने डॉ. गर्गे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर उच्च न्यायालयाने १२ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानुसार बुधवारी (ता. १२) डॉ. गर्गे यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी झाली असता, डॅा. गर्गे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या तपासाला सहकार्य करण्यासह अटी-शर्थींच्या अधिन रहत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (latest marathi news)

असे आहे प्रकरण...

रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कंपनीसाठी ना-हरकत प्रमाणपत्राकरीता दीड लाखांची लाच सहायक संचालक आरती आळे यांनी मागितली. ७ मे रोजी लाचेची रक्कम आरती आळे यांनी स्वीकारली होती. लाचेच्या हिश्यासंदर्भात आळे यांचे डॉ. गर्गे यांच्याशी बोलणे झाल्याचे तपासातून समोर आले.

याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन आळे यांची प्रसुती असल्याने त्यांना अटक न करता चौकशी केली जात आहे. तर डॉ. गर्गे हे गुन्हा दाखल झाल्यापासून पसार आहेत. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन यापूर्वीच फेटाळला होता. याप्रकरणी दोघा लाचखोरांना अटक झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave Alert : जानेवारीतही थंडीची लाट राहणार; पुढच्या तीन महिन्यांचा हवामान अंदाज आला समोर

Latest Marathi News Live Update : बंडखोरी करणाऱ्यांना शांत करण्यासाठी भाजपश्रेष्ठींनी घेतला पुढाकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले सक्रिय

Namo Bharat Train Video: नमो भारत ट्रेनमध्ये सेक्स करणारे कोण? लवकरच करणार लग्न, साखरपुडा उरकला... व्हिडिओ लीक झाल्याचं कारणही समोर

बॉलिवूडच्या खलनायकानं साकारलेली नायकाची भूमिका, 15 मिनिटात सिनेमा थिएटरमधून बाद, कोणता आहे 'तो' सिनेमा?

माेठी बातमी! राज्यातील दूध उत्पादक संकटात; खरेदी दरात सहा महिन्यांपासून वाढच नाही, पशुखाद्याचे दर वाढले

SCROLL FOR NEXT