नाशिक

सिटी लिंक च्या नवीन बस सेवा

CD
सकाळी, रात्रीच्या वेळेत चार मार्गांवर बसफेऱ्या ‘सिटीलिंक’चा प्रवाशांना दिलासा; वाहतुकीचा अधिक सोईस्कर पर्याय सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : शहरासह उपनगरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या (सिटीलिंक) वतीने चार मार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मार्ग क्रमांक २७७, १०६, १३० आणि १५२ या मार्गांवर नव्याने बसफेऱ्यांचे नियोजन केले असून, त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, सकाळी आणि रात्रीच्या वेळेतही प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्ग क्रमांक २७७ अंतर्गत नाशिक रोड डेपो ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि विद्यापीठ ते नाशिक रोड डेपो या मार्गावर म्हसरूळ, इंदिरानगर, महामार्ग व वरवंडी परिसरातून बसफेऱ्या धावणार आहेत. या मार्गावरील बसफेऱ्यांच्या वेळा सकाळी ८.३०, १०.१५, दुपारी ३.३५ आणि सायंकाळी ४.४० अशा आहेत. मार्ग क्रमांक १०६ वर तपोवन ते अमृतानगर आणि अमृता नगर ते तपोवन या मार्गावर सकाळी ७.४० आणि ८.४० वाजता बससेवा उपलब्ध असेल. या मार्गामुळे कमोदनगर, वासननगर आणि पाथर्डी फाटा परिसरातील प्रवाशांना फायदा होणार आहे. मार्ग क्रमांक १३० वर तपोवन टर्मिनस ते भगूर या दिशेने सायंकाळी ६.१५ वाजता, तर भगूर ते तपोवन टर्मिनस या दिशेने सकाळी ६.४५ वाजता बसफेरी सुरू केली आहे. या मार्गावर लहवित कॅम्प, बिटको, महामार्ग, अशोका मार्ग आणि मुंबई नाका परिसर जोडला जाणार आहे. --चौकट पिंपळगाव मार्गाला नव्याने जोडणी मार्ग क्रमांक १५२ वर सीबीएस ते पिंपळगाव ही बस रात्री ८ वाजता, तर पिंपळगाव ते सीबीएस ही बस सकाळी ६.५० वाजता धावणार आहे. या अतिरिक्त बसफेऱ्यांमुळे शहर आणि लगतच्या भागांतील प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक सोईस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी सिटीलिंकच्या नव्या बसफेऱ्यांचा लाभ घ्यावा आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Peace Prize 2026 : शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या भारतीय वंशाच्या नवी पिल्लई आहेत तरी कोण? जाणून घ्या थक्क करणारा प्रवास...

नवरात्रीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल! ठाणे-कल्याणमधील 'या' मार्गांवर नो एन्ट्री, काय असतील पर्यायी मार्ग?

Maharashtra Live News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर नवी मुंबईत भावुक क्षण; रांगोळीतून दिली अनोखी श्रद्धांजली

Chandrashekhar Bawankule : राज्यातील फासेपारधी व पारधी समाजाच्या अतिक्रमित जमिनींचे सातबारे करण्यासाठी कार्यवाही होणार

IND A vs AUS A 2nd ODI: भारताची पुन्हा हार, ऑस्ट्रेलियाकडून शिकार! पण 'एका'ने ठोकलाय न्यूझीलंड वन डे मालिकेसाठी दावा; कोण आहे तो?

SCROLL FOR NEXT