नाशिक

बस स्थानकांवर दागिने लांबवणारी महिला जेरबंद

CD
पान तीन ---------------- 31575 नाशिक : बसस्थानकात दागिने चोरीप्रकरणी जप्त मुद्देमाल. समवेत शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक. बस स्थानकांवर दागिने लांबवणारी महिला जेरबंद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : शहरासह परिसरात बस स्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन बॅगेतील मौल्यवान वस्तू व सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या एका सराईत महिलेलागुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. तिच्याकडून ७ लाख १२ हजार ३४४ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. निर्मला विजय लोंढे (वय ४०, रा. बालाजी नगर, टाकळी रोड, नाशिक रोड) असे अटक केलेल्या महिला संशयितेचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथक बसस्थानक परिसरात गस्त घालत होते. दरम्यान अंमलदार अप्पा पानवळ, राम बर्डे यांना चोरीच्या गुन्ह्यातील संशयित महिला मेळा बस स्थानक परिसरात येणार असल्याची खबर मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून निर्मला लोंढे हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिची विचारपूस केली असता, तिने शहापूर ते साक्री प्रवासादरम्यान बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याची कबुली दिली. अंगझडतीत सोन्याची चेन, मंगळसूत्र, हिऱ्याचे कानातले, नऊ खडे असलेले सोन्याचे पेन्डल आणि अंगठी असा ऐवज मिळून आला. पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रमेश शिंदे, दत्तात्रय पोटे व युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT