Business Meet-3 is going to be organized by AIMA in Nashik in August, officials of AIMA said. esakal
नाशिक

Nashik AIMA News : आयमातर्फे ऑगस्टमध्ये ‘बिझिनेस मीट-३’! ललित बूब यांची माहिती

Nashik News : ‘आयमा- नाशिक बिझनेस मीट-३’ २२ व २३ ऑगस्टला पाथर्डी फाट्यावरील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी पर्वणी आणि औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यास मैलाचा दगड ठरणारे ‘आयमा- नाशिक बिझनेस मीट-३’ २२ व २३ ऑगस्टला पाथर्डी फाट्यावरील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Business Meet 3 in August by Aima)

अनेक लघु आणि मध्यम उद्योजकांना काहीतरी नवीन करून दाखवायचे असते. त्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठाची आवश्यकता असते. तसेच मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनासाठी विश्वासू वेंडर्सचा शोध घेत असतात. त्यामुळे या सर्व घटकांना एकत्र आणणे, तसेच त्यांच्यात आपापसांत समन्वय घडवून आणून उत्पादनांना जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आयमा नाशिक बिझिनेस मीट-३’ मोठी भूमिका बजावणार आहे.

आपल्या उत्पादनांसाठी योग्य भागीदार निवडून खरेदीदारांशी थेट कनेक्ट होण्याची संधीही यामुळे नाशकमधील लघु आणि मध्यम आणि विशेषतः नवोदित आणि होतकरू उद्योजकांना उपलब्ध होणार आहे. या बिझिनेस मीटमध्ये चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

दोनशेहून अधिक प्रतिनिधी या मीटमध्ये सहभागी होऊन आपल्या अनुभवाची देवाणघेवाण करणार आहेत. चेन्नई, बेंगलोर, चंदीगड, मुंबई, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यांतील विविध बड्या कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि कॉनस्यूलेट जनरल यांची उपस्थिती हेसुद्धा या मीटचे खास वैशिष्ट्य आहे. (latest marathi news)

नावीन्यपूर्ण उत्पादने या मीटच्या माध्यमाने सर्वांसमोर प्रदर्शित करण्याची, तसेच संपर्कांचे एक मजबूत जाळे विणण्याची आयतीच संधी यामुळे उपलब्ध होणार असल्याचेही बूब यांनी सांगितले. आयमा नाशिक बिझिनेस मीट-३ यशस्वितेसाठी उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, योगेश कोठावदे, सचिव प्रमोद वाघ, कोषाध्यक्ष गोविंद झा.

बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, सहसचिव योगिता आहेर, हर्षद बेळे या मीटचे चेअरमन रवी महादेवकर, को-चेअरमन मनीष रावल, माजी अध्यक्ष वरुण तलवार यांच्यासह आयमाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT