typing skill esakal
नाशिक

Nashik News : टंकलेखन कौशल्यासाठी 1:5 प्रमाणात उमेदवार बोलवा; उमेदवारांसह संघटनांची 'MPSC'कडे मागणी

Nashik : अराजपत्रित गट क सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत नियोजित टायपिंग (टंकलेखन) कौशल्‍य चाचणीत एकास पाच या प्रमाणात उमेदवारांना बोलवावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अराजपत्रित गट क सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत नियोजित टायपिंग (टंकलेखन) कौशल्‍य चाचणीत एकास पाच या प्रमाणात उमेदवारांना बोलवावे, अशी मागणी होत आहे. उमेदवारांसह विविध संघटनांकडून यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा केला जात आहे. ‘एमपीएससी’तर्फे गेल्या वर्षी अराजपत्रित गट क सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत सुमारे ७ हजार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. (nashik Call candidates for typing skills in ratio institutes to MPSC marathi news)

त्‍यानुसार पूर्व आणि मुख्य परीक्षा पार पडल्‍या. पुढील प्रक्रियेत टंकलेखन कौशल्य चाचणी नियोजित आहे. साधारणतः वर्षभरात विविध संवर्गांसाठी सरळसेवा परिक्षांतून उमेदवारांची नियुक्‍त्‍या झालेल्‍या आहेत. त्‍यामुळे चाचणीसाठी कमी उमेदवार उपलब्‍ध होण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने १:३ ऐवजी १:५ असे प्रमाण चाचणीसाठी ग्राह्य धरावे, अशी मागणी होत आहे. (latest marathi news)

गतवर्षी कमी जागा असल्याने आयोगाने १:३ प्रमाणात उमेदवारांची पात्रता चाचणी घेतली होती. यादरम्‍यान सरळसेवा माध्यमातून विविध विभागांच्या मोठ्या संख्येने जागांवर भरती झालेली आहे. त्‍यामुळे पात्र उमेदवारांतून अनेक उमेदवार टंकलेखन पात्रता परिक्षेला गैरहजर राहाण्याची शक्‍यता आहे. ही गोष्ट लक्षात घेता एकास पाच या प्रमाणात उमेदवारांना चाचणीत समाविष्ट करावे, सुशिक्षित बेरोजगारांसोबत न्‍याय करावा, अशी मागणी हो आहे.

''शासनाच्‍या वेगवेगळ्या विभागांच्‍या परीक्षा, सरळ सेवा भरती प्रक्रिया पार पडलेल्‍या आहेत. या प्रक्रियेतील अनेक यशस्‍वी उमेदवार हे अराजपत्रित गट कच्या टंकलेखन चाचणीसाठीही पात्र ठरलेले आहेत. त्‍यांना नोकरी मिळाल्‍याने त्‍यांच्‍या गैरहजर राहाण्याची दाट शक्‍यता आहे. त्‍यामुळे टंकलेखन कौशल्‍य चाचणीला एकास तीनऐवजी एकास पाच या प्रमाणात उमेदवारांना बोलविले पाहिजे.''- महेश बडे, स्टुडंट राईट असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT