Crowd of passengers to board the reserved coach of the train. esakal
नाशिक

Nashik News : तिकीट आरक्षित करूनही कुचंबणा; रेल्वेगाड्यांत आरक्षण केलेल्या प्रवाशांची धावपळ

Nashik News : आरक्षित डब्यात जनरल तिकीट श्रेणीचे प्रवासी घुसखोरी करून रिझर्व्हेशन करून सीट मिळविलेल्या प्रवाशांना जागा देण्यावरून वादावादी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

अंबादास शिंदे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शाळांना सुट्ट्या असल्याने सर्वच रेल्वे गाड्यांना फुल्ल गर्दी आहे. सुटीत आणि मतदानासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांनी चार ते सहा महिने अगोदरच रेल्वेच्या तिकिटाचे आरक्षण करून ठेवले आहे. असे असतानाही आरक्षित डब्यात जनरल तिकीट श्रेणीचे प्रवासी घुसखोरी करून रिझर्व्हेशन करून सीट मिळविलेल्या प्रवाशांना जागा देण्यावरून वादावादी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. (Nashik News)

रेल्वेने अशा प्रवाशांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होऊनही रेल्वेचे तिकीट निरीक्षक बघ्याची भूमिका घेतात, रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार केल्यानंतर जवान लाकडी काठ्या आपटतात मात्र त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.

कल्याणसह मुंबईतील विविध स्थानकातून रेल्वे गाड्या इतक्या भरून येतात की रेल्वे स्थानकावर दोन-पाच मिनिटांत एवढी गर्दी नियंत्रणात आणणे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना शक्य होत नाही. जनरल डब्यात पाय ठेवण्यास जागा नसते. त्यामुळे अनेक प्रवासी सर्वसाधारण तिकिटावर आरक्षित डब्यांतून प्रवास करतात.

तिकीट तपासनीस (टीसी) आरक्षित डब्यात एखादी जागा रिकामी असेल, तर संबंधित प्रवाशाला जागा देतात. मात्र, जागा नसली, तरी या डब्यातून प्रवासाची परवानगी दिली जाते. आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्यांना नियमित केल्याने त्यांना जागा न मिळाल्यास हे प्रवासी डब्यात शौचालयालगतच्या दरवाजात, जागेत, आसनांच्या मधल्या जागेत बसून प्रवास करतात. यामुळे डब्यांतील गर्दी वाढून उर्वरित प्रवाशांना डब्यात ये-जा करण्यास अडचणी येतात. (latest marathi news)

वर्षानुवर्षे त्याच गाड्यांवर भार

काही प्रवाशांनी मुंबईतून नाशिक रोडमार्गे मराठवाड्यात जाण्यासाठी गेल्या २०-२५ वर्षांपासून सकाळच्या वेळेत एकच तपोवन एक्स्प्रेस तर दिवसभरात केवळ चार गाड्या सुरू असल्याचे सांगितले. रेल्वेने गेल्या २०-२५ वर्षांत वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करून या मार्गावर परवडणाऱ्या दरांत गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी उभे राहण्यासही जागा न मिळाल्याने त्रस्त झालेल्या प्रवाशांनी केली.

बाबा गेल्या दशम्याही

काही प्रवाशांना रेल्वेस्थानकावर पोचून गर्दीमुळे गाडीत चढताही येत नाही, अशा स्थितीत जागा नाही आणि आरक्षित तिकिटाचे पैसेही नाही, अशी वेळ अनेकांवर येते. यामुळे निदान रेल्वेने आरक्षित तिकिटाचे पैसे परत देण्याची तरी सुविधा करावी, १३९ क्रमांकावर नुसती तक्रार ऐकून घेतली जाते आरक्षित केलेल्या तिकिटाच्या पैशाचा एक पैसाही परत मिळत नसल्याची व्यथा प्रवाशांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest Updates: नेपाळमध्ये हिंसाचाराचा भडका ! भारताने विमान, रेल्वे सेवा केली स्थगित, नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Ballari Jail : 'या' अभिनेत्याने रडत रडत न्यायाधीशांकडे कारागृहात केली विष देण्याची विनंती; असं काय घडलं त्याच्यासोबत?

Latest Marathi News Updates : आज मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Chhagan Bhujbal : ‘कुणबी’चा आदेश मागे घ्यावा; ओबीसींच्या हक्कांवर गदा आणू नका

मोहोळ तालुका हादरला! गलंदवाडी येथील दांपत्यास कोयत्याने मारहाण करून दरोडा; दोघेजण जखमी, जीवे मारण्याची धमकी अन्..

SCROLL FOR NEXT