toll naka (file photo) esakal
नाशिक

Nashik News : कारची लोकल म्हणून नोंद तरीही 225 रुपये टोल वसूल; पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील प्रकार

Nashik : लोकल कारला टोलमधून सूट असतानाही फास्ट टॅगमधून २२५ रुपये कट झाल्याने वाहन मालकाने टोल प्रशासनावर संशय व्यक्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर टोलचा झोल सुरूच असून लोकल कारला टोलमधून सूट असतानाही फास्ट टॅगमधून २२५ रुपये कट झाल्याने वाहन मालकाने टोल प्रशासनावर संशय व्यक्त केला आहे. ओझर येथील व्ही. बी. वाघ यांची कार (क्रमांक एम एच १५ जीएल ९१२६) ची पिंपळगाव टोल नाक्यावर लोकल कार म्हणून टोलमधून सूट मिळण्यासाठी नोंद झाली आहे. (car is registered as local Rs 225 toll is charged at Pimpalgaon Baswant)

ओझर ते सटाणा प्रवासात सकाळी जाताना २२५ रुपये टोल फास्ट टॅगमधून कट झाला. मात्र सटाणा येथून ओझरला येताना फास्ट टॅगमधून टोल कट झाला नाही. त्यांचे हे वाहन लोकल टोल असूनही पिंपळगाव टोल नाक्यावरून पैसे कट झाल्याचा मेसेज वाघ यांना टोल नाक्यावरून पुढे आल्यानंतर आला. असाच प्रकार याच कारबाबत दीड महिन्यापूर्वीही घडला होता. (latest marathi news)

त्यावेळी मालेगाव जाताना टोल कट झाला नव्हता मात्र रात्री अकरा वाजेला परत येताना २२० रुपये टोल कापला गेला. यामुळे पिंपळगाव टोल नाक्यावर अजूनही टोलचा झोल सुरू असल्याचा आरोप होत असून किती मोठ्या प्रमाणात पैसे वसूल होत असतील, असा प्रश्न उपस्थित करत संबंधित यंत्रणेने चौकशी करावी, अशी मागणी वाहन धारकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोरेगावच्या जंगलात भीषण आग

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT