nashik Central Jail esakal
नाशिक

Nashik Central Jail : कारागृह नव्हे, सुधारणेसह पुनर्वसनाची व्यवस्था! 240 दोष सिद्ध बंदी कैद्यांना स्वावलंबनाचे धडे

Central Jail : रोजगार व स्वयंरोजगार व जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Central Jail : मध्यवर्ती कारागृहातील बंदी कैद्यांना शिक्षा भोगून झाल्यानंतर समाजात स्थिर स्थावर होता यावं तसेच स्वतःचा चरितार्थ चालविण्यासाठी कुठल्यातरी कामाचं ज्ञान व कौशल्य असावं, यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही, यासाठी कौशल्य विकास अंतर्गत जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार व जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ()

विशेष म्हणजे यात महिला बंदी कैद्यांसाठीही काही कोर्सची व्यवस्था केली आहे. आयुष्यामध्ये केलेल्या कळत वा नकळत चुकीबद्दल सुधारण्याची संधी ही प्रत्येकाला मिळालीच पाहिजे. कारागृह ही फक्त शिक्षा भोगण्याची वास्तू नसून बंदी कैद्यांमध्ये सुधारणा व पुनर्वसन करण्याची एक व्यवस्था आहे, याच उद्देशाने नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये २४० दोष सिद्ध झालेले बंदी कैदी विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबनाचे धडे गिरवीत आहेत.

भविष्यात कारागृहातून सुटका झाल्यानंतर कुणावरही अवलंबून न राहता आपला छोटासा व्यवसाय वा उद्योग ते सुरू करू शकतील, यासाठीचे कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण करणे असा प्रयत्न कारागृहामार्फत केला जात आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने वेल्डिंग फॅब्रिकेशन, बांबू वर्क, नर्सरी, मधुमक्षिका पालन अशा विविध कोर्सेसचा समावेश आहे. ही प्रशिक्षणे २०० तासांपासून ३६० तासांपर्यंतची वेगवेगळ्या प्रकारची आहेत. (latest marathi news)

कारागृहात बंदी असलेल्या महिलांच्या आयुष्यालाही नवी दिशा मिळू शकते. हे कोर्स कारागृहातील बंदी महिलांचे भविष्य बदलून टाकणारे आहेत. कारागृहातून सुटका होताच त्यांना आत्मनिर्भर होता यावे म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे. ड्रेस डिझायनिंग, ब्युटीपार्लर, एम्ब्रोईडरी वर्क असे कोर्स कारागृहातील महिलांना शिकविले जात आहेत. त्यातून या महिलांमध्ये वैचारिक परिवर्तनाला सुरवात झाली आहे.

कळत-नकळत घडलेल्या गुन्ह्यात महिला कारागृहात बंदी आहेत. अशावेळी त्यांचे वैचारिक संतुलन ढासळू शकते. या महिला न्यायालयातून निर्दोष ठरून कारागृहाबाहेर पडल्या तरी अनेकदा त्यांना घरात घेतले जात नाही. कुठले कामही मिळत नाही. अशा महिलांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर समाजात त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावं या उद्देशाने सदर कोर्सेस कारागृहात उपलब्ध करून दिले जातात.

''सुधारणा व पुनर्वसन हे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. यानुसार या दोन्ही बाबी बंदी कैद्यांच्या बाबतीत अपेक्षित आहे. कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर त्याचा पुनर्वसन योग्य व्हावे, त्याचा चरितार्थ चालावा, यासाठी कोर्सचे आयोजन केले जाते. त्यानंतर त्यास कुशल असे प्रमाणपत्रही दिले जाते. त्याचा भविष्यात त्यांना उपयोग होतो.''- अरुणा मुगुटराव, कारागृह अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT