MHT-CET Application Exam News sakal media
नाशिक

CET परीक्षा अर्जप्रक्रिया आजपासून सुरू, मे-जूनमध्ये पेपर होणार

मे-जूनमध्ये परीक्षा; व्‍यावसायिक पदवी, पदव्‍युत्तर पदवीचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक: शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर झाले आहे. उद्या (ता.१९) पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात होते आहे. तर मे महिन्‍यापासून परीक्षांना सुरवात होत आहे. गेल्‍यावर्षी कोरोना महामारीमुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्‍या कालावधीत राज्‍यात कोरोना महामारीची दुसरी लाट आल्‍याने संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली होती. परिणामी विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा विलंबाने झाली.

आता शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता वेळेत संपूर्ण प्रक्रिया राबविण्याचा सीईटी सेलचा प्रयत्‍न आहे. या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांसाठी संभाव्‍य वेळापत्रक सीईटी सेलतर्फे जारी केलेले आहे. यापैकी काही अभ्यासक्रमांसाठी उद्या (ता.१९) पासून अर्ज प्रक्रियेला सुरवात होत आहे. मे आणि जून महिन्‍यात टप्‍याटप्‍याने सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

सीईटी सेलने जारीकेल्‍या सूचना

संभाव्‍य वेळापत्रकासोबत सीईटी सेलने सूचनादेखील जारी केल्‍या आहेत. त्‍यानुसार हे संभाव्‍य वेळापत्रक असून, वेळ व आवश्‍यकतेनुसार वेळापत्रकात बदल करता येऊ शकते. एकदा भरलेल्‍या अर्जात बदल करता येणार नाही. भरलेले शुल्‍क परत मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी भरलेल्‍या अर्जाची प्रिंट व सॉफ्टकॉपी जतन करून ठेवायची आहे. या प्रतीची प्रवेशाच्‍या वेळी आवश्‍यकता भासेल.

असे आहे शिक्षणक्रमनिहाय संभाव्‍य वेळापत्रक-

(वेळापत्रक तात्‍पुरते असून, वेळप्रसंगी सीईटी सेल बदल करून शकते)

शिक्षणक्रम अर्ज भरण्याची मुदत परीक्षेची तारीख

एलएलबी (३ वर्षे २४ मार्च ते १२ एप्रिल ७ व ८ जून

एलएलबी (५ वर्षे) १९ मार्च ते ७ एप्रिल १७ व १८ मे

बीए-बीएड./बी.एस्सी.- १९ मार्च ते ७ एप्रिल ९ मे

(४ वर्षे संयुक्‍त)

बी.एड.-एम.एड.- १९ मार्च ते ७ एप्रिल ९ मे

इंटिग्रेटेड

बी.पी.एड. २२ मार्च ते ७ एप्रिल ११ ते १५ मे

एम.पी.एड. २२ मार्च ते ७ एप्रिल १९ ते २२ मे

एम.एड. २२ मार्च ते ७ एप्रिल १९ मे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Women Protect : वाघिणीचं काळीज! एकाच गावाला १३ वाघांचा वेढा, महिलांनी जे केलं ते थरारक; वाघांना नडणाऱ्या बायका म्हणून कौतुक

Neha : 18 वर्षांचं करियर, 14-15 चित्रपट, 9 तर निघाले फ्लॉप..तरीही आज 40,00,00,000 कोटी संपत्तीची मालकीण, राजकीय घराण्याशी खास कनेक्शन

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यात गाडीचा अपघात; चौघे गंभीर जखमी

CET Exam : मार्च ते मे दरम्‍यान परीक्षा! इंजिनिअरिंग, फार्मसीसह विविध सीईटी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाणून घ्या

Satara Politics : दोन्ही राजांचे आवाहन धुडकावले! साताऱ्यात २४ प्रभागांत बंडखोरी; नगराध्यक्षपदासाठी नऊ जणांत लढत

SCROLL FOR NEXT