BBA-BCA CET Exam esakal
नाशिक

BBA-BCA CET Exam : ‘बीबीए-बीसीए’ अभ्यासक्रमांस ‍पुन्‍हा सीईटीचा संभ्रम! महाविद्यालयांना आदेश तोंडी

Nashik News : यंदा प्रथमच पदवी स्‍तरावरील बीबीए, बीसीए, बीबीएम या अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन केले होते. यापूर्वी ही सीईटी परीक्षा पार पडलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : यंदा प्रथमच पदवी स्‍तरावरील बीबीए, बीसीए, बीबीएम या अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन केले होते. यापूर्वी ही सीईटी परीक्षा पार पडलेली आहे. असे असताना आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने पुन्‍हा एकदा सीईटी घेतली जाणार असल्‍याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे. (CET exam was organized for first year admission to BBA BCA BBM courses)

महाविद्यालयांनादेखील याबाबत तोंडी माहिती असून, परिपत्रकाची प्रतीक्षा लागून आहे. त्‍यामुळे संभ्रमावस्‍था निर्माण झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. बहुतांश सीईटी परीक्षा पार पडलेल्‍या असून, अनेक परीक्षांचे निकालदेखील जाहीर करण्यात आले आहे.

यापैकी बीबीए, बीसीए, बीबीएम या अभ्यासक्रमाची सीईटी पार पडलेली असून, निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते आहे. असे असताना आणखी व्‍यापक प्रमाणातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने पुन्‍हा संधी दिली जाणार असल्‍याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. यासंदर्भात कुठेच लेखी आदेश आढळून आला नाही. (latest marathi news)

तसेच व्‍यवस्‍थापनशास्‍त्र महाविद्यालयांकडे चौकशी केली असता, तोंडी स्वरूपात माहिती उपलब्‍ध असल्‍याचे सांगण्यात आले. एकंदरीत या संपूर्ण प्रकाराबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित यंत्रणांनी यासंदर्भात सूचना जारी करताना स्‍पष्टता आणावी, अशी मागणी केली जाते आहे.

फायदा कुणाला होणार?

दरम्‍यान बारावीचा निकाल जाहीर होऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. त्‍यामुळे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी प्रचंड उत्‍सुक आहेत. अशात बीबीए, बीसीए यांसारख्या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाला विलंब झाल्‍यास विद्यार्थी इतर अभ्यासक्रमांकडे वळण्याची शक्‍यता असून, अप्रत्यक्षरीत्या अशा अभ्यासक्रमांना फायदा होईल. त्‍यामुळे विलंब न करता दुसऱ्यांदा सीईटी घेतली जाणार असल्‍यास, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली जाते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT